राहुरी : मागील आठवडयात झालेल्या अती पावसामुळे राहुरी तालुक्यातील क पाशी पिकाचे मोठया प्रमाणावर नुक सान झाले. कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत़ राहुरी तालुक्यात १५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे,राहुरी तालुक्यात कपाशी पिकाची १० हजार २०० हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकाची नोंद झाली आहेग़ेल्या वर्षी तालुक्यात ६हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती़ सोयाबीन व तुरीखालील क्षेत्र कपाशीखाली आल्याने यंदा कपाशीची लागवड वाढली आहे़ कपाशीला गेल्यावर्षी पाच हजार रूपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला होता़ यंदाही कपाशीला चांगलाभाव मिळेल व दिवाळीला आधार होईल म्हणून शेतकºयांनी कपाशीचे पीक घेतले.मुळा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर कपाशीचे पीक घेण्यात आले आहे़ काळया जमिनीवर पाणी साचल्याने कपाशीची मुळे कुजून कपाशीचे पीक पिवळे पडले आहे. कपाशीची किती हेक्टर क्षेत्रावरील लागवड उफाळून नुकसान झाले? याचे चित्र पुढील आठवडयात स्पष्ट होणार आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिसकावून नेला आहे़ खोलगट जमिनीत पाणी साचल्याने ते बाहेर क ाढण्याची व्यवस्था नसल्याने पीक जळून गेले आहे़चर नसल्याने शेतामध्ये पाणी काळया जमिनीमध्ये शेतकºयांनी पाटाचे पाणी दिले होते़ त्यानंतर पावसाचे आगमन झाले़ पाणी वाहून जाण्यासाठी चर नसल्याने शेतामध्ये पाणी साचले. त्यामुळे कपाशीच्या मुळया कुजून कपाशी पिकाचे नुकसान झाले़ हक्काचे पीक म्हणून कपाशीकडे शेतकरी वळले़ पावसामुळे ऊस पीक मात्र बचावले आहे़.-आबाजी वाळूंज शेतकरी............................................फोटो : ३१ कपाशीकॅप्शन : कपाशीच्या शेतात पाणी साचल्याने पीक असे उफाळून गेले आहे़
अति पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 19:10 IST