लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: मुकुंदनगर परिसरातील पाणीप्रश्नी केलेल्या मागणीची दखल न घेतल्याने नगरसेवक असिफ सुलतान यांनी बुधवारी आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन केले. दरम्यान, त्यांना अधिकाऱ्यांनी उठविण्याचा प्रयत्न केला. अधिकारी व नगरसेवक सुलतान यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
नगरसेवक असिफ सुलतान यांच्यासह कार्यकर्ते दुपारी महापालिका आयुक्तांच्या दालनात आले. मुकुंदनगर परिसरातील पाणी पश्नावर प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने प्रशासन झोपा काढते आहे का, असा प्रश्न करत सुलतान हे फर्शीवर झोपले. दरम्यान, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह परिमल निकम, सहायक नगररचनाकार राम चारठणकर यांनी सुलतान यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. वेळोवेळी मागणी करण्यात आली; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे सुलतान यावेळी म्हणाले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मुकुंदनगर भागाला दोन ते चार दिवासांआड पाणी पुरवठा होतो, तसेच घनकचरा, ड्रेनेजलाइन, बंद पथदिवे व रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. येत्या एप्रिलमध्ये रमजानचे उपवास सुरू होणार असून, या भागातील विविध मागण्या सुलतान यांनी केल्या होत्या; परंतु प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही, असे सुलतान यांचे म्हणने होते.
...
सूचना फोटो: साजिदच्या फोल्डरमध्ये आहे.