शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा रिपोर्ट आता दोन तासात; प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या लॅबला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:59 IST

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. लॅबमुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. राज्य शासनाची मान्यता असलेली ही जिह्यातील पहिलीच टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डॉ.राजेंद्र विखे यांनी दिली. 

लोणी  : प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. लॅबमुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. राज्य शासनाची मान्यता असलेली ही जिह्यातील पहिलीच टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डॉ.राजेंद्र विखे यांनी दिली. विद्यापीठाच्या मॉयक्रोबॉलोजी विभागाला कोरोना तंत्रज्ञानाला नॅशनल अ‍ॅक्रिरेडेशन बोर्ड फॉर लॅबरोटरीचे सर्टिफीकेशन व राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेत डॉ.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ.वाय.एम.जयराज, मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.राजवीर भलवार, मॉयक्रोबॉयलोजी विभागप्रमुख डॉ.शरीयार रोशनी, डॉ. रवींद्र कारले उपस्थित होते. मॉयक्रोबायोलॉजी विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत ट्रनॅट मशिन व आरटीपीसीआर तंत्रज्ञान स्वीकारले. त्यासाठी नॅशनल अ‍ॅक्रीरेडेशन बोर्ड फॉर लॅबरोटरी यांचे सर्टिफीकेशन मिळवले. त्यानंतर कोरोनाच्या टेस्टसाठी लॅबला राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. कोरोनाच्या रिपोर्टसाठी आता दोन दिवस थांबण्याची गरज पडणार नाही. हे रिपोर्ट फक्त दोन तासात उपलब्ध होतील. लॅबमध्ये शासनाकडून आलेल्या कोरोना संशयित रुग्णाच्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाणार आहे, असेही डॉ. विखे यांनी सांगितले.  कुलगुरु डॉ. वाय. एम. जयराज म्हणाले,  विद्यापीठाने संकट काळात सहा दिवसात कोविड-१९ साठी १०० बेडचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय उभारले आहे. आता नवी अत्याधुनिक लॅब सुरु केली आहे. यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. दोन तासाला चार टेस्ट  लॅबच्या माध्यमातून दोन तासाला चार टेस्ट होतील. हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षीत असून लॅबच्या टीमला प्रक्षिक्षण देण्यात आले असल्याचे मॉयक्रोबॉयोलोजी विभागप्रमुख डॉ.शरियार रोशनी यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या