शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:36 IST

साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.

शिर्डी : साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.दाभोळकरांची वयोवृद्ध नात अंजली प्रधान-दाभोळकर यांनी ही अमूल्य भेट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, डॉ़आकाश किसवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.१९१० साली अण्णासाहेब सर्वप्रथम शिर्डीला आले. पहिल्या भेटीतच बाबांनी त्यांना हेमाडपंत ही पदवी बहाल करत साईसच्चरित्र लेखनास अनुमती दिली. अण्णासाहेबांनी लेखनाची सुरूवात मात्र बाबांच्या निर्वाणानंतर चार वर्षांनी १९ मार्च १९२२ रोजी गुढीपाडव्याला केली. त्यांनी जसे जसे अध्याय लिहिले तसे हे अध्याय १९२३ पासून संस्थानच्या साईलिला मासिकात क्रमश: प्रसिद्ध करण्यात आले. शेवटचा एकावन्नावा अध्याय साईलिलेत छापायला पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी १५ जुलै १९२९ रोजी दुपारी अण्णासाहेबांचे हृदयविकाराने निधन झाले.अण्णासाहेब ५२ वा अध्याय अवतरणीका म्हणून लिहिणार होते. मात्र अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब देव यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी बावन्नव्या अध्यायाची अण्णासाहेबांनी काढलेली टिपणे बघितली. मात्र त्यांना अवतरणीका सापडली नाही. त्यामुळे त्यांनी टिपणावरून ५२वा अध्याय पूर्ण केला. स्वत: अवतरणीका लिहून तो त्रेपन्नावा अध्याय म्हणून ग्रंथाला जोडला़ १९२९ पर्यंत साईलिलेतून क्रमश: प्रसिद्ध झालेले साईसच्चरित्र २६ नोव्हेंबर १९३० रोजी सर्वप्रथम ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. आजवर १६ भाषेबरोबरच संस्थानने साईसच्चरित्राच्या मराठीत तब्बल ३३ आवृत्या प्रसिद्ध केल्या असल्या तरी संस्थान दप्तरी पहिल्या आवृत्तीची प्रत नव्हती़ मुगळीकरांच्या विनंतीवरून अंजली प्रधान यांनी ती संस्थानला भेट दिली. ही प्रत सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर