शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा वाद; तालुका बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:20 IST

आता दर्गा नव्हे तरच मंदिरच होणार अशी भूमिका यात्रा समितीने घेतली असून या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

अहिल्यानगर: श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज मंदीर जीर्णोद्धार प्रश्नावर आजपासून यात्रोत्सव समितीने श्रीगोंदा शहर बेमुदत बंदची हाक दिली आहे. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिवसभर यात्रा समिती व ट्रस्टी यांच्यात समझोता घडवण्यासाठी बैठका झाल्या. मात्र, यातून काहीच फलित निघाले नाही. त्यामुळे आता दर्गा नव्हे तरच मंदिरच होणार अशी भूमिका यात्रा समितीने घेतली असून या मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

बैठकीला आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते, राहूल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, पोपटराव खेतमाळीस, आमीन शेख, गोपाळराव मोटे, तहसीलदार प्रविण मुदगल, पोलिस निरीक्षक किरणकुमार शिंदे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, नायब तहसीलदार पंकज नेवसे, अशोक आळेकर, नवनाथ दरेकर, शहाजी खेतमाळीस, सुदाम झुंझरुक आदी उपस्थित होते. दुपारी १ वाजता यात्रा समिती व ट्रस्ट सदस्यांना तहसीलदार कार्यालयात निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र, हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख व सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यानंतर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आमीन शेख यांच्याबरोबर बैठक केली आणि श्रीगोंदेकरांच्या भावना विचारात घेऊन दोन पावले मागे घ्या, मंदिर जीर्णोद्धारसाठी मी निधी उपलब्ध करुन देतो. तुम्ही आणि यात्रा समिती एकत्र काम करा, असे त्यांनी सांगितले. त्यास ट्रस्ट सदस्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर रात्री आठ वाजता यात्रा समिती सदस्य व ट्रस्ट सदस्यांची बैठक झाली. 

यावेळी ट्रस्टच्यावतीने आमीन शेख म्हणाले हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ऐवजी मंदिर असा नावात बदल करू पण अध्यक्ष मीच राहील आणि आमदारांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व आमचे दोन व यात्रा समितीचे दोन सदस्य असलेली समिती जीर्णोद्धाराचे काम होईपर्यंत काम करेल. कामे झाले की, ही समिती बरखास्त करा. तसेच मंदिर देखभाल ट्रस्टकडे राहील. यात्रा समितीने हरजत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट बरखास्त करा आणि मंदिराचे पावित्र्य राखणे व जीर्णोद्धारसाठी शेख परिवाराने मंदिर परिसरातील जागा तत्काळ मोकळी करुन द्यावी एवढीच भूमिका घेतली. ही भूमिका ट्रस्ट सदस्यांनी अमान्य केली. दरम्यान, "संत शेख महंमद महाराज मंदीर जीर्णोद्धार होणे, हा श्रीगोंदेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण हा विषय सोडवण्यासाठी ट्रस्ट व यात्रात्सव समितीने न्याय भूमिकेतून चर्चा करावी. यातून प्रश्न सुटेल आणि मंदिर जीर्णोद्धारही होईल," अशी भूमिका आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मांडली आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरTempleमंदिर