शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचारी वाहताहेत आरोग्याची धुरा

By सुधीर लंके | Updated: April 10, 2020 17:30 IST

राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचारीही जीवावर उदार होत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोविड-१९ च्या संकटाचा मुकाबला करत आहेत. आम्ही तुमच्या आदेशाप्रमाणे धोका पत्करुन सेवा देत आहोत. मात्र, आमचाही कधीतरी विचार करा, अशी भावनिक साद या कर्मचा-यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.

अहमदनगर : राज्य शासनाच्या आरोग्य सेवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे २८ हजारांच्या घरात आहे. हे कर्मचारी सेवेत नियमित नाहीत. मात्र, आज हे कर्मचारीही जीवावर उदार होत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोविड-१९ च्या संकटाचा मुकाबला करत आहेत. आम्ही तुमच्या आदेशाप्रमाणे धोका पत्करुन सेवा देत आहोत. मात्र, आमचाही कधीतरी विचार करा, अशी भावनिक साद या कर्मचा-यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे.केंद्र शासनाने २००५ मध्ये राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियान आणले. या अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांचे दवाखाने येथे कंत्राटी तत्वावर काम करण्यासाठी तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध झाले. या कर्मचा-यांना दरमहा मानधन दिले जाते. सुरुवातीला या खर्चाचा ८० टक्के भार केंद्र तर २० टक्के भार राज्य शासन उचलत होते. आता हे प्रमाण ७५ व २५ टक्के आहे.२०१५-१६ मध्ये या अभियानाचे नाव बदलून ते राष्टÑीय आरोग्य अभियान करण्यात आले. या अभियानांतर्गत काम करणा-या कर्मचाºयांमध्ये परिचारिका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी, विशेतज्ज्ञ, समन्वयक, डाटा आॅपरेटर, लेखापाल अशी विविध पदे आहेत. यातील अनेक कर्मचा-यांनी पहिली संधी म्हणून ही नोकरी स्वीकारली. मात्र, अनेक वर्षांपासून ते अकरा महिन्याच्या कंत्राटावर काम करतात. दरवर्षी या कंत्राटाचे नूतनीकरण होते. त्यामुळे नोकरी टिकणार की जाणार ? अशी टांगती तलवार असते. मासिक मानधनाव्यतिरिक्त त्यांना इतर काहीही सुविधा मिळत नाहीत. यातील अनेक कर्मचाºयांचे नोकरीचे वय देखील निघून गेल्यामुळे त्यांच्या इतरत्र नोकरी करण्याच्या संधीही संपल्या आहेत. नियमित शासकीय कर्मचाºयांप्रमाणेच या कर्मचा-यांना पूर्णवेळ काम करावे लागते. किंबहुना कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरीची भिती दाखवून त्यांच्याकडून अधिक काम करुन घेतले जाते. सध्या कोरोनाच्या संकटातही आमची ड्युटी प्राधान्याने लावली जाते असे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे.या कर्मचा-यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी मंत्रालयीन अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने काही शिफारशी केल्या. तसेच न्यायालयानेही शासनास निर्देश दिलेले आहेत. मात्र, त्यानंतरही निर्णय झाला नाही. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. या काळात आम्ही कुठलेही आंदोलन व तक्रार करणार नाही. मात्र आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे शासन भरणार आहे. आतातरी आमचा सेवेत कायम करण्यासाठी विचार करा, अशी साद या कर्मचा-यांनी घातली आहे.

आरोग्य सेवेतील राज्यातील कंत्राटी कर्मचारी

अधिपरिचारिका- ८,०५९परिचारिका- ४,११५प्रयोगशाळा तंत्रज्ञ-१,०४१औषधनिर्माते- १,५१७तज्ज्ञ डॉक्टर- ५९८वैद्यकीय अधिकारी- ३,३१०अतांत्रिक- ३,५६५इतर पदांसह एकूण- २८, १५६

अनेक आरोग्य कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर २०१५ पासून काम करत आहेत. कोरोनाच्या संकटातही हे कर्मचारी शंभर टक्के योगदान देत आहे. उलट त्यांना सर्वात प्राधान्याने ड्युटी लावली जाते. मात्र, या कर्मचाºयांना कायम करण्याबाबत सरकारने सातत्याने टाळाटाळ केली. आतातरी त्यांना न्याय मिळावा.- किरण शिंदे, माजी कोषाध्यक्ष, राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य