शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने जगण्याची दृष्टी लाभते/ विष्णू महाराज पारनेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 21:50 IST

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी कसे बाेलतात हे माऊलींनी सांगितले आहे. कसे बाेलावे, कुठे बाेलावे आणि काेणापुढे बाेलावे याचे नियम आहेत. अर्जुन म्हणताे, माझा माेह गेला आहे. अर्जुनाने अनेक प्रश्न आदराने, अनादरानेही विचारले आहेत.  कारण भगवान श्रीकृष्ण त्याचे जसे गुरू आहेत. तसेच सखा आणि मित्रही आहेत.

ज्याप्रमाणे शेतीत नांगरणे आणि पेरणे हे अव्याहत करावे लागते. तसेच शिष्याला सतत सांगावे लागते तरच त्याला अमृततत्त्वाला प्राप्ती होते. ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने चर्मचक्षु, ज्ञानचक्षु अाणि अंतिम दिव्यचक्षु प्राप्त हाेते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी कसे बाेलतात हे माऊलींनी सांगितले आहे. कसे बाेलावे, कुठे बाेलावे आणि काेणापुढे बाेलावे याचे नियम आहेत. 

अर्जुन म्हणताे, माझा माेह गेला आहे. अर्जुनाने अनेक प्रश्न आदराने, अनादरानेही विचारले आहेत.  कारण भगवान श्रीकृष्ण त्याचे जसे गुरू आहेत. तसेच सखा आणि मित्रही आहेत. त्यामुळे भगवान म्हणतात, मी मागेही तुला सांगितले आहे आणि आताही सांगतो. मी तुझे अवधान पाहत आहे. शिष्य आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे, अशा पद्धतीने गुरूने राहावे लागते. निवृत्तीनाथांशी कसे बाेलावे, श्राेत्यांशी कशी सलगी करावी, शिष्य ही सलगी करत असताे, त्याला किती आणि कशी सलगी करू द्यावयाची हे गुरूने ठरवावे लागते. 

ज्ञानेश्वर माऊलीही श्रीकृष्णसंदर्भात एकापाठाेपाठएक दृष्टांत देतात. डाॅ. रामचंद्र पारनेरकर महाराजही आपल्या प्रवचनातून अनेक प्रमाण आणि दृष्टांत देत हाेते. त्यावेळी उपस्थितांना वाटायचे की, हे प्रमाण आहे की प्रमेय आहे. माठ नवीन घेतल्यानंतर त्यात थाेडे पाणी घालून ताे गळका आहे की नाही हे आपण पाहताे. तसेच शिष्याचे मडके कसे आहे हे गुरू तपासत असताे. शब्दांना ताे जाणताे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आता तु किरीटी आहेस. म्हणजेच तुझ्या मस्तकावर आता  मुकूट चढणार आहे. आता तू कायमचा आमचा निजधाम झाला आहेस. तू एकदम तत्पर आहेस. एखादा माेठा पर्वत पाहिल्यानंतर लगेच त्याकडे जावे वाटते तसेच मला तुझ्यावर वर्षाव करावा वाटताे. कृपाळूंचा राजा म्हणजे ज्ञानदेव. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. अर्जुन हा अजानबाहू हाेता. प्रत्येकवेळेला तेच ते सांगितले तरीही अमृततत्त्व प्राप्त हाेते, असा प्रतिबाेध गुरू देत असतात.

दरवर्षी  शेत नांगरताे आणि पेरताे ते करावेच लागते. शिष्यांना सतत मार्गदर्शन करावे लागते. साेन्याला जितकेवेळा तापवाल तेवढे ते शुद्ध हाेते. शिष्यांना मी जेव्हा शिकवताे त्यात माझाही स्वार्थ आहे. अंगात रग आल्याशिवाय पैलवान कुस्ती खेळत नसताे. चपळता आणि ताकद हे दाेन्हीही गुण कुस्तीगीराला आवश्यक आहेत. तसेच गुरूला जेव्हा शिष्य तयार करायचे असतात, त्यांना काही अधिकार द्यावयाचे असतात. तेव्हा शिष्याची रग वाढविली जाते. माझ्या स्वरुपाच्या विभूतीची माहिती मी देणार आहे, असे भगवंत म्हणतात.

मला तू पुर्णत्त्वाने ओळखावे हा माझा स्वार्थ आहे, असे गुरू म्हणताे. त्यातूनच गुरू चर्मचक्षू आणि ज्ञानचक्षूचे काम शिष्याकडून करवून घेत असताे आणि त्यानंतर शिष्याला दिव्यचक्षू मिळत असताे. ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने चिंतन, मननाने चर्मचक्षू, ज्ञानचक्षू आणि अंतिम दिव्यचक्षूची प्राप्ती हाेते. आई आपल्या मुलाला तयार करत असते, त्याला न्हावू घालते, अलंकार घालते तसेच माऊलींच्या दृष्टीने मी तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्यावर भक्ती आणि साहित्याचे अलंकार चढवित आहे.

 

शिष्याचे हित झाले की, गुरूला सुख मिळत असते. हत्तीच्या मस्तकातून गंडस्थळातून जसा मद येताे आणि ताे फाेडण्यासाठी वज्रमूठ तयार करावी लागते तसे अर्जुना तुला परमार्थात आणावयाचे आहे. त्यामुळे परमेश्वराची कृपा तुला व्हावी म्हणून मी तुला तयार करत आहे. मला तुझी आवड लागली. देवाची आवड लागली म्हणजे काय हाेते, याचे सुंदर उदाहरण संत तुकाराम आहेत. ज्यांना पांडुरंगाने सदेह वैकुंठाला नेले. देवाला आवडी लागली की ताे थांबत नाही. तुला काही फायदा हाेईल की नाही. पण तू अवधान दे असे भगवंत म्हणतात. मी सांगताे हे परमवाक्य आहे. पूर्णपुरुष तुला भेटण्यास आला आहे. असे समज आणि हे सर्वव्यापक आहे. हे नुसते अक्षर नाही तर परमब्रह्म आहे. ह्रदयातून बाहेर आलेले बाेल मी थांबवू शकत नाही. तुला स्पष्टपणे बाेध झाला नसला तरीही मी सारथ्य म्हणून आलो असून आणि तुला सतत मी सांगत राहील. परमार्थात चिंतन लागते ही आपल्याला सवय हाेते. अनेकदा कितीही सांगितले तरीही शिष्य तयार हाेत नाहीत. ईश्वरकृपा प्राप्त हाेण्यासाठी पात्रता वाढवावी लागते. आी वडिलांनी काय केले हे जर मुलांना कळत नसेल तर त्याला काय म्हणावे. अशी प्रस्तावना करून भगवंत म्हणतात, यत्न विद्या मी दिलेली आहे, तरी आता तु मला ओळख.

वेदसुद्धा माझे पूर्ण वर्णन करू शकले नाहीत. विष्णु, विश्व आणि शिव हे तिन्ही माझे पूर्णपुरुषाचे रूप आहे. पूर्णपुरुषाचे मन क्षणार्धात काेठेही पाेहाेचते. भगवंत म्हणतात, तुमच्या ठिकाणी असलेले मनसुद्धा मीच अाहे. अष्टदा प्रकृती म्हणजे मी आहे. त्याची सुरूवातही मीच केली आहे. त्यातच वीस प्रकारचे भाव आहेत आणि त्यातूनच श्रीकृष्ण हे रुप प्रगटत असते. उदरात असणारा गर्भ आपल्या आईचे वय सांगू शकत नाही. जरी ताे तिच्या पाेटात असताे. देव माझ्या उदरात आहे, मला ते तेहतीस काेटी देव ओळखू शकत नाही. जलात राहणाऱ्या माशालाही समुद्राची खाेली माहिती नसते, तर अवकाशात हिंडणाऱ्या माशीला आकाशाची उंची माहिती नसते. तसेच अनेक महर्षी आहेत, पण त्यांना मी अजून कळालाे नाही, मी काेण आहे हे त्यांना अजून कळाले नाही.

 

एका डाेळा पाहे देवाजीचे रुप।

दुजाने पाहती मानव हा।।

 

अर्जुनाच्या अंत:करणात भगवंत त्यांची मांडणी करत आहेत. अर्जुना तू  भीष्माला मारलेस, तू कर्णाला मारलेस, तू युद्ध जिंकलास तरीही तू मल ओळखले नाहीस. झाड वाढलं तरीही त्याला पाणी कुठून मिळते हे माहिती नसते. देवा तुम्ही निर्गुण रुपात आहात, सगुण रुपात या असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

 

-विष्णु महाराज पारनेरकर (पारनेर, जि. अहमदनगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक