शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील खड्डेमय रस्त्यांसंदर्भात काँग्रेसचे भर उन्हात ठिय्या आंदोलन

By अरुण वाघमोडे | Updated: May 19, 2023 17:16 IST

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

अरुण वाघमोडे, अहमदनगर: नगर शहरातील रस्त्यांच्या कामासंदर्भात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टचे प्रकरण गाजत असताना काम झालेल्या रस्त्यांची इन कॅमेरा गुणवत्ता पडळताळणी करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१९) भर उन्हात येथील प्रोफेसर चौकातठिय्या आंदोलन केले. मनपाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल न घेतल्याने उपस्थितांनी तीव्र निषेध केला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फिरत्या लॅबसह सरप्राईज भेट देत शहरातील किमान दहा रस्त्यांची नागरिकांसमवेत संयुक्तरित्या इन कॅमेरा कामांचादर्जा तपासण्याची मागणी काँग्रेसने केली होती. यासाठी काँग्रसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नियोजित पुतळा स्थळाजवळ दुपारच्या भर उन्हात छात्र्यांचा आधार घेत ठिय्या मारावा लागला. यावेळी बोलताना काळे म्हणाले शहरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा दर्जा तपासण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. म्हणूनच त्यांनी पळ काढला आहे. मनपा अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरत राजकीय संगनमतातून जनतेच्या पैशांची लूट केली आहे. आमच्या मागणीसंदर्भात आयुक्तांना लेखी पत्र दिले होते. आमदारांसह नगरसेवकांनाही जाहीर आव्हान केले होते. मात्र जनतेच्या दरबारात न येता या सर्वांनीच पळ काढला.

आंदोलनात मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, राणी पंडित,विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे, सोफियान रंगरेज, किशोर कांबळे, अजय मिसाळ, आरिफ शेख, फिरोज शेख आदींसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन