याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमख हे उपस्थित होते. अद्ययावत तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचा उपयोग तरुण, शेतकरी वर्ग आणि शास्त्रज्ञांनी कार्यक्षमपणे करावा. तरूण शेतकरी वर्ग यांनी स्वतःच्या शेतावर निविष्ठा तयार करण्यासाठी प्राधान्य द्यावे. त्यामुळे निविष्ठांवर होणाऱ्या खर्चात बचत होईल, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केल्याबद्दल हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्प आणि सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाचे विशेष कौतुक केले.
या प्रशिक्षणात ८० प्रशिक्षणार्थी सहभाग नोंदवला. यामध्ये देशातील शेतकरी, विद्यार्थी व शास्त्रज्ञ होते. डॉ. अशोक फरांदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शरद गडाख यांनी एकात्मिक सेंद्रिय शेती संशोधन विषयी मत मांडले. कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी प्रकल्पाची माहिती दिली. प्रमाणपत्र अभ्यासक्रम कार्यक्रमाचा आढावा डॉ. उल्हास सुर्वे यांनी घेतला.