कंपोष्ट खतनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पिचड यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
पिचड म्हणाले, कारखान्याने यंदा आजपर्यंत गळिताची परंपरा कायम राखत ४ लाख ४० हजार २७४ मेट्रिक टन गळीत करून ४ लाख ५४ हजार ४८० साखर पोते ऊत्पादन केले आहे. नगर जिल्ह्यात अग्रणी साखर उतारा मिळाला आहे. कंपोष्ट खत हा प्रकल्प यापुढे शेतकऱ्यांच्या निश्चितच फायद्याचा आहे आणि गांडूळ खत व शेणखतापेक्षाही खत निश्चितच चांगल्याप्रकारचे आहे.
कार्यकारी संचालक भास्कर घुले म्हणाले, अगस्तीने कंपोष्ट खतनिर्मिती प्रकल्प प्रत्यक्ष सुरू केला आहे. टाकाऊ पदार्थांपासून चांगल्याप्रकारचे कंपोष्ट खत शेतकऱ्यांसाठी निर्माण करता येईल. कारखान्यातून जे प्रेसमडबाहेर पडते त्यावर डिस्टिलरीमधून निघणारे स्पेन्टवॉश फवारून एरोट्रिलरचे साहाय्याने एकत्रीकरण करुन तसेच डिकंम्पोझिंग कल्चर टाकून ४५ दिवस कुजवून त्यापासून कंपोष्ट खत तयार करण्यात येते. हे कंपोष्ट खत शेतकऱ्यांना विक्री करण्यात येणार आहे.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक वैभव पिचड, प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे, कचरू शेटे, अशोक देशमुख, अशोक आरोटे, रामनाथ वाकचौरे, राजू डावरे, मीनानाथ पांडे, मच्छिंद्र धुमाळ, भीमसेन ताजणे, भाऊसाहेब देशमुख, सुनील दातीर, महेश नवले, भास्कर बिन्नर, सुरेखा देशमुख, मनीषा येवले उपस्थित होते.