शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विमानाचे सीट बनविणारी नगरमधील कंपनी आगीत खाक; सहा कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 10:44 IST

नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्या एकाच वेळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होत्या, रात्री ११ वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली.

ठळक मुद्देनागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली.१२ अग्निशमन दलाच्या गाड्या एकाच वेळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होत्या, रात्री ११ वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली. आगीने कंपनीचे सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्या एकाच वेळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होत्या, रात्री ११ वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत कंपनीचे सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.नागापूर एमआयडीसीत पुगलिया वुलन ही कंपनी आहे. या कंपनीत विमानाचे कुशन (सीट) तयार होते. हे सीट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपनीत उच्च प्रतीचे कापड होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता या कंपनीत आग लागली. कंपनीतील कापडाने भराभर पेट घेतल्यामुळे काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीने वेढली गेली. आग लागल्याचे समजताच कर्मचा-यांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.आग विझविण्यासाठी महापालिकेचे ३, विखे साखर कारखान्याचे ३, एमआयडीसीचे ३, व्हीआरडीचे २, तनपुरे कारखान्याचे एक असे एकूण १२ अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझविण्यासाठी तब्बल सव्वा चार लागले. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या आगीत सुमारे सहा कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण हेही घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते़ कंपनीबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कंपनीचे मालक संजय पुगलिया हे मुंबईत राहतात. रात्री ते नगरमध्ये दाखल होऊ शकले नाहीत. तर कंपनीचे व्यवस्थापक तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या गावाकडे गेलेले आहेत. त्यामुळे अद्याप कंपनीकडून या जळीतकांडाची फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही़ कंपनीचे प्रशासन आज नगरमध्ये येऊन फिर्याद देतील, अशी शक्यता कंपनीच्या कामगारांनी वर्तविली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMIDCएमआयडीसीfireआग