अहमदनगर : नगरपासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड नाक्याजवळ खड्डे चुकविताना गॅसच्या टेंपोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ऋषिकेश रघुनाथ उगले (वय २०, रा. जेऊर हैबती) हा जागीच ठार झाला़ तर अन्य एकजण जखमी झाला आहे़ जखमीला नगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली असून, त्याचे नाव अद्याप समजजू शकले नाही़ नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील विश्वभारती कॉलेजमध्ये तो शिकत होता. आज सकाळी दहा वाजता तो कॉलेजला जात असताना हा अपघात झाला.
खड्ड्याने घेतला कॉलेज तरुणाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 11:21 IST