शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याचे सहकुटूंब उपोषण : शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:59 IST

शेतात जाण्यासाठी बांधावरून गाडीरस्ता बंदोबस्तात करून देण्याचा आदेश असताना तहसीलदारांचे प्रतिनिधी रस्ता खुला न करता निघून गेले.

जामखेड : शेतात जाण्यासाठी बांधावरून गाडीरस्ता बंदोबस्तात करून देण्याचा आदेश असताना तहसीलदारांचे प्रतिनिधी रस्ता खुला न करता निघून गेले. त्यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी, तसेच जेसीबी व ट्रॅक्टरसाठी खर्च झालेल्या रकमेचा निष्कारण भुर्दंड सोसावा लागल्याने हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी वयोवृद्ध शेतकरी कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.पोपट माणिक तागड (वय ६५ रा.खुटेवाडी, मुंजेवाडी ग्रा. पं.) यांची खुटेवाडी शिवारात गट क्रमांक ७५ मध्ये शेतजमीन आहे. शेती वहीत करण्यासाठी त्यांना वडिलोपार्जीत जमीन गट क्रमांक ८० मधून जावे लागते. परंतु शेजारील शिवाजी तागड हे जमिनीतून जाऊ देत नसल्याने पोपट तागड यांनी तहसीलदारांकडे २०११ मध्ये तक्रार केली होती. तत्कालीन तहसीलदारांनी १२ मार्च २०१२ रोजी गट क्रमांक ७६ मधून दक्षिण बांधाने गाडी रस्ता खुला करून देण्याचा आदेश दिला.तहसीलदारांच्या आदेशाला प्रतिवादी शिवाजी तागड यांनी कर्जतच्या प्रांताधिका-यांकडे अपील दाखल केले. तत्कालीन प्रांताधिका-यांनी २०१६ रोजी शिवाजी तागड यांचे अपील फेटाळून जामखेड तहसीलदारांनी दिलेला आदेश कायम ठेवला होता. २०१६ रोजी शिवाजी तागड यांनी अप्पर जिल्हाधिका-यांकडे अपील दाखल केले होते. १५ मे २०१७ रोजी अप्पर जिल्हाधिका-यांनी पात्रतेच्या मुद्यावर अपील फेटाळले. न्याय न मिळाल्याने त्यांनी तहसीलदारांना २ मे रोजी निवेदन देऊन २२ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तहसीलदारांनी दखल न घेतल्यामुळे पोपट तागड कुटुंबीयांसह उपोषणास बसले आहेत.तहसीलदार, प्रांत, अप्पर जिल्हाधिकारी असा सहा वर्षांचा कोर्टकचेरी प्रवास केल्यानंतर वयोवृद्ध शेतकरी पोपट तागड यांनी तहसीलदार विजय भंडारी यांच्याकडे रस्ता खुला करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. तहसीलदारांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मोहन कुमटकर यांची नियुक्ती केली. संबधित शेतक-याने पोलीस बंदोबस्तासाठी ५ हजार ५२५ रूपये भरले. रस्ता तयार करण्यासाठी एक जेसीबी मशीन व ६ ट्रॅक्टरसाठी ३० हजार रूपये शेतक-यांनी दिले. १६ एप्रिल २०१८ रोजी तहसीलचे प्रतिनिधी मोहन कुमटकर आले, पण रस्ता खुला करून देता निघून गेले. त्यामुळे शेतकरी पोपट तागड यांचा ३५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च विनाकारण वाया गेला. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड