शेवगाव : ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ असा नारा देत सुरु केलेले स्वच्छता अभियान केवळ कागदोपत्री राहणार नाही, याची काळजी नगरपरिषदेने घ्यावी, अशी सूचना खासदार दिलीप गांधी यांनी दिली़ शेवगाव नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून खासदार गांधी यांच्या हस्ते करण्यात आला़ अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विद्या लांडे होत्या़ शेवगाव शहरातील शिवाजी चौक, बाजारपेठ, क्रांती चौक, बसस्थानक चौक, आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक आदी परिसरात नगरसेवक, नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले. खा.गांधी यांनी विकास कामे करताना त्या कामाची गरज लक्षात घेऊन विकास निधी उपलब्ध करण्याला आपला प्राधान्यक्रम असतो. शेवगाा नगर परिषदेने सुचिवलेल्या विकास कामासाठी केंद्र सरकार तसेच खासदार विकास निधीतून रक्कम उपलब्ध करून देण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. स्वच्छता अभियान केवळ कागदोपत्री राहणार नाही. याची नगर परिषदेने दक्षता घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. नगर परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती शब्बीर शेख यांनी उपक्रमात सर्वांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी युवक नेते अजिंक्य लांडे, कृष्णा ढोरकुले, शब्बीर शेख, साईनाथ आधाट, विकास फलके, अजय भारस्कर, भाऊसाहेब कोल्हे, महेश फलके, दिनेश लव्हाट, अशोक आहुजा, भाजपचे तालुका अध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, अरुण मुंढे, दिगंबर काथवटे, नितीन दहिवाळकर आदींची उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)
स्वच्छता अभियान कागदोपत्री नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:41 IST