शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस येताच शहराचे पाणी बंद!

By admin | Updated: June 5, 2014 00:08 IST

अहमदनगर: मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसला. वीज वाहक तारा तुटल्याने वसंत टेकडी येथील पाणी उपसा करणारे पंप बंद पडले.

अहमदनगर: मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसला. वीज वाहक तारा तुटल्याने वसंत टेकडी येथील पाणी उपसा करणारे पंप बंद पडले. त्यातच बुधवारी देहरे गावाजवळ मुख्य पाईपलाईनही लिकेज झाली. दोन दिवस शहरातील काही उपनगरांना पाणी पुरवठा झालेला नाही. वादळी पावसाने वसंत टेकडी परिसरात वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा करणार्‍या मुख्य वीज वाहिनीच्या तारा तुटल्या. त्याचप्रमाणे येथील रोहित्रही नादुरूस्त झाले. खंडित वीज पुरवठा व नादुरूस्त रोहित्र यामुळे वसंत टेकडी येथून होणारा पाणी उपसा बंद पडला. वीज वितरण कंपनीने तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेतले असून पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशी माहिती महापौर संग्राम जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिली. या तांत्रिक अडचणीमुळे सावेडी उपनगर, गुलमोहर रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगरचा काही भाग तसेच रेल्वेस्टेशन रस्ता, विनायकनगर, आगरकर मळा, केडगावातील काही भागास बुधवारी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. बुधवारी देहरे गावाजवळ जुनी मुख्य जलवाहिनी पाणी व हवेच्या दाबाने लिकेज झाली. जलवाहिनी दुरूस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले असले तरी त्यास विलंब लागणार आहे. (प्रतिनिधी)