शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

नगर जिल्हा परिषद त्रिशंकू

By admin | Updated: February 23, 2017 18:53 IST

नगर जिल्हा परिषदेच्या ७२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि.23 : नगर जिल्हा परिषदेच्या ७२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था आहे. कॉंग्रेसने सर्वाधिक २३ तर त्याखालोखाल राष्ट्रवादीने १८ जागा मिळविल्या आहेत. ‘मिशन फोर्टी’चा नारा देणारा भाजप १४ जागांवर थबकला आहे.

शिवसेना ७, माजी खासदार यशवंतराव गडाख यांची आघाडी ५, भारतीय कम्युनिस्ट पक्ष १ तर अपक्ष ४ असे जिल्ह्यातील बलाबल आहे. अपक्षांतील एक सदस्य हा बाळासाहेब थोरात यांचा समर्थक असल्याने कॉंग्रेसचे संख्याबळ तसे २४ वर गेले आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व कोपगावच्या भाजप आमदार स्रेहलता कोल्हे यांना त्यांच्या तालुक्यात धक्के बसले आहेत. या आमदारांना जिल्हा परिषदेची एकही जागा मिळाली नाही. नेवाशाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनाही जिल्हा परिषदेची एकच जागा मिळाली.

नगर जिल्हा परिषदेत गतवेळी राष्ट्रवादीने ३२ तर कॉंग्रेसने २८ जागा मिळविल्या होत्या. या दोन्ही पक्षांची घसरण झाली आहे. गतवेळी अवघ्या सहा जागांवर असलेल्या भाजपने दुपटीहून अधिक जागा मिळवत १४ जागांवर मुसंडी मारली आहे. मात्र त्यांना जिल्ह्यातील क्रमांक एकचा पक्ष होण्याचे स्वप्न साकार करता आले नाही. शिवसेनेची गतवेळेपेक्षा केवळ एक जागा वाढली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर नेवासा तालुक्यातील माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला रामराम करत स्वतंत्र आघाडी करुन शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या नावावर ही निवडणूक लढवली. त्या आघाडीला नेवासा तालुक्यातील सातपैकी पाच जागा मिळाल्या असून नेवासा पंचायत समितीवरही त्यांनी वर्चस्व मिळविले आहे.

जिल्ह्यातील १४ पैकी दोन पंचायत समित्या कॉंग्रेसकडे, तीन भाजपकडे, तीन राष्ट्रवादीकडे, दोन सेनेकडे, एक सेना-भाजप युतीकडे तर एक गडाख यांच्या आघाडीकडे गेली आहे. श्रीरामपूर व कर्जत पंचायत समितीत त्रिशंकू अवस्था आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांना पंचायत समितीतील सत्ता गमवावी लागेल असे चित्र आहे. कारण या पंचायत समितीतील १२ पैकी ४ जागा भाजप व ४ सेनेने जिंकल्या आहेत. भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा पंचायत समिती राष्ट्रवादीकडून आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेत एकूण ७३ गट आहेत. एका गटाची निवडणूक न्यायप्रविष्ट असल्याने ती बाकी आहे. बहुमतासाठी ३७ जागांची आवश्यकता आहे. मात्र, तो आकडा एकाही पक्षाला गाठता आलेला नाही. नगर जिल्हा परिषद पक्षीय बलाबलकॉंग्रेस२३राष्ट्रवादी१८भाजप१४शिवसेना०७भाकप०१शेतकरी क्रांतीकारी पक्ष०५अपक्ष०४एकूण ७२