शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

एका क्लिकवर आता नगर पर्यटन

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

संदीप रोडे, अहमदनगर नगर शहराची ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक माहिती असलेले अ‍ॅप उपायुक्त अजय चारठाणकर यांनी विकसित केले आहे.

संदीप रोडे, अहमदनगरनगर शहराची ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक माहिती असलेले अ‍ॅप उपायुक्त अजय चारठाणकर यांनी विकसित केले आहे. एक क्लिकवर त्या माध्यमातून नगर शहरातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून नगरचे नाव जगभर झळकणार आहे. स्थापना दिनी (२८ मे) त्याचे लाँचिंग केले जाणार आहे. पर्यटन स्थळांचे फोटोही त्यावर असणार आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी व शिंगणापूर येथे देशभरातून पर्यटक येत असतात. नगर शहरात भुईकोट किल्ला, महल, किल्ल्यातील नेता कक्ष, मेहेराबाद, रणगाडा संग्रहालय, हिवरेबाजार, दमडी मशीद अशी ऐतिहासिक ठिकाणं आहे. मात्र त्याची माहिती शिर्डीत येणाऱ्या पर्यटकांना असतेच असं नाही. माहिती नसल्याने नगर शहरात पर्यटक येत नाहीत. नगर शहराची ही माहिती जगभर जावी या हेतूने चारठाणकर यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅप विकसित करत असताना महापालिकेला एक रुपयाचाही खर्च आलेला नाही हे विशेष. प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. नगर शहरात प्रवेश करताच ते अ‍ॅप शहरातील पर्यटनस्थळांची माहिती देईल. निगेव्हीशेन असल्याने किती अंतरावर आहे. तेथे कसे जायचे याची माहितीही पर्यटकांना मिळणार आहे. जगाच्या पाठीवर कोठेही बसून नगर शहरातील पर्यटनाची माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. पर्यटन मार्गदर्शन केंद्रही महापालिकेच्यावतीने सुरू केले जाणार आहे. त्यासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. नगर शहरातील व्यापार, रोजगार निर्मिती व पर्यटनाची सांगड घालत हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. सुरूवातीला अ‍ॅपवर पर्यटनाची माहिती असली तरी नंतर त्यावर हॉटेल, वैद्यकीय सुविधा, व्यापार याची माहिती लोड केली जाणार आहे. देशात ठरेल मॉडेलएखाद्या शहराची माहिती असलेले अ‍ॅप अजूनपर्यंत तरी कोणी विकसित केलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे पर्यटन खाते आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे अ‍ॅप पर्यटन विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे. पर्यटन खाते राज्यभर या अ‍ॅपचा वापर करू शकेल. इतकेच काय देशभरातील पर्यटनाची माहिती एका क्लिकवर अ‍ॅपच्या माध्यमातून पर्यटकांना मिळणार आहे. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांनीही त्यात पुढाकार घेतला आहे. नगर शहरात पर्यटनासारखी ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ती माहिती असतातच असं नाही. ही माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी अ‍ॅप विकसित केले आहे.-अजय चारठाणकर, उपायुक्त.