शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये मतदानासाठी आल्या ११,६९५ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 15:43 IST

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे सहा दिवस उरले आहेत. २१ आॅक्टोबर रोजी मतदान असून त्यादृष्टीने प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यानिमित्त निवडणूक आयोगाकडून सर्व साहित्य जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. आवश्यक स्टेशनरी, फिलिंग पेपर, फक्की, ईव्हीएम मशीनसाठी लागणारे कव्हर, तसेच मतदारांच्या हाताला लावण्यात येणारी शाई आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. आलेले हे सर्व साहित्य १२ मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे पाठविण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर (अंगठ्याशेजारचे बोट) निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३ हजार ७२२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बूथवर तीन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीत १० मिली निळी शाई असते. एका बाटलीत किमान ३५० मतदारांना पुरेल एवढी शाई असते. यासाठी मुंबईहून ११ हजार ६९५ (११ लिटर) शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. बोटावर लावलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसली जात नाही. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे. १९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापरदेशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचाच वापर करण्यात येत आहे. खास मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई म्हैसूर येथील एका कंपनीमध्ये तयार करण्यात येते. भारतात उत्पादित या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करतात. बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा२००४ मधील निवडणुकीच्या वेळी मतदान करणा-या मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर अशी रेषा मारली जात आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या प्रमाणात शाई जास्त लागते.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019