न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळ आयोजित ऑनलाईन विशेष व्याख्यानात ते बोलत होते. भारतामध्ये जवळ जवळ तीन हजारांच्यावर बोलीभाषा आहेत. परंतु त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून त्यापैकी फक्त १२१ भाषांना अधिमान्यता देण्यात आली आहे, हा अनेक बोलीभाषांवर झालेला अन्याय आहे. नागरिकत्वाची हेळसांड अनेक घटकांमधून होत असते. बऱ्याच वेळेस नवीन कायदे विशिष्ट जात समूहावर अन्याय करत असतात, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतात. सांस्कृतिक नागरिकत्व नाकारणारे कायदे समाजस्वास्थ टिकवण्यात अडचणी आणतात, म्हणूनच प्रत्येकाने निर्भय व सजग बनणे गरजेचे आहे. महाविद्यालय गेल्या पन्नास वर्षापासून राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला उच्च शिक्षणात सहभागी होता यावे यासाठी महाविद्यालय तत्पर असते, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी प्रास्ताविकात केले.
व्याख्यानानंतर झालेल्या खुल्या चर्चेत अनेक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. डॉ. गणेश देवी यांनी अनेक संदर्भ देत त्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिले. या विशेष व्याख्यानासाठी विज्ञान शाखेचे उपप्रचार्य डॉ. अरुण पंदरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. दिलीप मोटे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राजक्ता ठुबे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन गणेश निमसे यांनी केले. सामाजिक शास्त्र मंडळाचे प्रमुख डॉ. के. एम. अंबाडे यांनी आभार मानले.
--------