शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

करिअर निवडून त्या दिशेने आगेकूच करा-मंदार जवळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:01 IST

ध्येय ठरवताना वाटेत येणारे प्रलोभने, आमिषे  प्रयत्नपूर्वक टाळावेत. मोबाईलचा वापर करताना सोशल मीडिया योग्य पद्धतीने वापरला तर करिअरसाठी ते उपयुक्त ठरते. परंतु गैरवापर केल्यास करिअर खराबही होऊ शकते, असा मोलाचा सल्ला पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी युवकांना दिला आहे. 

अनिल साठे ।  शेवगाव : युवकांनी शिक्षणाबरोबर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करिअरचे ध्येय लवकरात लवकर निश्चित करून त्या दिशेने आगेकूच करायला हवी. ध्येय ठरवताना वाटेत येणारे प्रलोभने, आमिषे  प्रयत्नपूर्वक टाळावेत. मोबाईलचा वापर करताना सोशल मीडिया योग्य पद्धतीने वापरला तर करिअरसाठी ते उपयुक्त ठरते. परंतु गैरवापर केल्यास करिअर खराबही होऊ शकते, असा मोलाचा सल्ला पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी युवा दिनानिमित्त युवकांना दिला आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार, युवा वर्गाला उद्देशून त्यांनी केलेले प्रेरणादायी भाषण, त्यांच्या अमोघ वाणीतून उतरलेले सुविचार आजही आपले आयुष्य योग्य दिशेला नेण्यासाठी पूरक ठरले आहेत. असे विचार ज्यांनी मांडले ते आद्यगुरू, विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस सन १९८५ पासून ‘जागतिक युवा दिन’ म्हणून साजरा होतो. युवकांना स्वामी विवेकानंदांचे हे विचार प्रेरणादायी ठरतात.व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करताना अभ्यासाबरोबर मैदानी खेळ व इतर कलागुणांनाही वेळ दिला पाहिजे. स्पर्धेत टिकायचे असेल तर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हेही लक्षात आले पाहिजे. यशाला परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्वत:ची क्षमता वाढवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. स्पर्धेला सामोरे जाणारा तरुण हा जग बदलवण्याची ताकद स्वत:मध्ये ठेवतो. आपल्याला आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर त्याची जडणघडण नेहमी सुरू ठेवावी, असे ते म्हणतात. कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचारासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे आणि स्वत:साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे दुस-यासाठी वेळ द्या. कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही, असे विचार स्वामी विवेकानंदांनी मांडले आहेत. ‘त्यांना’ अभिप्रेत असलेला देश व देशातील युवक घडवायचा असेल तर त्यांचे विचार जोपासायला हवेत, असेही जवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसinterviewमुलाखतShevgaonशेवगाव