राहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आठ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. त्यानंतर, डावा कालवा बंद करून शोधकार्य हाती घेतल्याचे डावा कालवा अभियंता विकास गायकवाड यांनी सांगितले.काळे आखाडा येथील सार्थक डुक्रे हा मुलगा चार मित्रांसमवेत डाव्या कालव्यावर गेला होता़ पोहत असताना तो गटांगळ्या खाऊ लागला. अन्य मित्रांनी आरडाओरड केली़ मात्र, तो वाहून गेला.
मुळा कालव्यातून बालक गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 05:36 IST