शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे,राधाकृष्ण विखे : साईबाबा जन्मस्थळाचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 20:14 IST

शिर्डी : मुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. यातून करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर फुंकर घालावी, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्निवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़

शिर्डी : मुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. यातून करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर फुंकर घालावी, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्निवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़विखे म्हणाले, जन्मस्थळाबाबत जे दावे केले जातात. त्याला पाठबळ देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये. या संदर्भात शासन समिती नेमण्याच्या विचारात आहे. त्यास आपला पूर्ण विरोध असून त्याची आवश्यकताच नाही. साईबाबांनी कधी जात- धर्म सांगितला नाही. साईसच्चरित्रातही तसा उल्लेख नाही़ अनेक प्रयत्न करून तो ब्रिटिशांनाही शोधता आला नाही़ त्यामुळे ते जगभर सर्वधर्म समभावाचे प्रतिक बनले आहेत़ पाथरीला निधी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र तो जन्मस्थळाच्या नावाने देऊ नये. आजवर साईबाबांच्या जन्मस्थळाचे अनेक दावे करण्यात आले, त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही. तरीही वारंवार दावे करण्यात येतात, यामागे काहीतरी षड्यंत्र आहे. पाथरीकरांकडे २९ पुरावे आहेत तर इतक्या दिवस त्यांनी ते का पुढे आणले नाहीत?त्यांनी हा वाद वाढवू नये.यावेळी कैलास कोते, शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर, सुजीत गोंदकर, रवींद्र कोते, नितीन कोते, दत्तात्रय कोते, हरिश्चंद्र कोते, पोपट श्ािंदे, जगन्नाथ गोंदकर, सचिन शिंदे, साईराज कोते, विलास कोते, गणेश कोते, मधुकर कोते  उपस्थित होते.----------चुकीची माहिती कोण देतोराष्ट्रपतीनींही असाच उल्लेख केला होता. याबाबत त्यांना शिर्डीकरांनी भेटून माहिती दिली होती. त्यानंतर ते पाथरीला गेले नाहीत़ राष्ट्रपती असो की मुख्यमंत्री, त्यांना चुकीची माहिती कोण देतो? याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे़ साईसंस्थानला नुकतीच दाभोळकरांच्या नातीने साईसच्चरित्राची मुळ प्रत भेट दिली आहे़ त्या प्रतीचे पुनर्प्रकाशन करून तिच प्रत आधारभूत मानून तिचेच अन्य भाषेत भाषांतर करावे. त्यामुळे वारंवार असे प्रकार होणार नाहीत. त्यासाठी संस्थानने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही विखे यांनी केले़ वेळेत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर बंद मागे घ्यायचा की बेमुदत सुरू ठेवायचा ते ग्रामसभा ठरवेल व त्याला आपला पाठिंबा असेल असेही विखे म्हणाले़---बंद काळात अत्यावश्यक सेवा सुरु बंद काळात साईमंदिर, प्रसादालय, भक्तनिवास, रूग्णालये, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत़ तर हार-फुलांची व अन्य दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी बंद राहणार आहे़--सध्या अनेक शिर्डीकर व्हॉटस अ‍ॅप स्टेटसला साईबाबांचा फोटो ठेवत आहेत़ राधाकृष्ण विखे यांनी आजवर स्टेटसला कधीही कोणताही फोटो ठेवला नाही़ त्यांनी प्रथमच आज साईबाबांचा फोटो ठेवून ग्रामस्थांच्या आंदोलनात साईभक्त म्हणून उतरल्याचा संदेश दिला़--दाभोळकर लिखित मूळ साईसच्चरित्रात जन्मस्थळाचा उल्लेख नाही. संस्थानने मराठी ग्रंथाच्या आजवर ३६ आवृृत्या काढल्या, त्यातील आठव्या आवृत्तीत हा उल्लेख असल्याचे पाथरीकर सांगतात, मात्र हा उल्लेख या आवृत्तीत घुसडण्यात आला होता़ नंतरच्या आवृत्तीत तो काढण्यात आला़ भाषांतरे करतांनाही संस्थानच्या दुर्लक्षाने तो काही आवृत्तीत छापला गेला, असे विखे यांनी स्पष्ट केले.