शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा छिंदम अजूनही उपमहापौरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:14 IST

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरांपर्यंत पोहोचवलाच नाही.

अहमदनगर : भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरांपर्यंत पोहोचवलाच नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शुक्रवारी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्याच्या उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खा. दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. छिंदम याने दिलेल्या राजीनाम्याची प्रतही माध्यमांकडे पाठविण्यात आली होती. मात्र छिंदम याने पदाचा राजीनामा दिला असल्याचे शहर जिल्हाध्यक्षांना पत्र लिहिले आहे. प्रत्यक्षात छिंदम याने महापौरांच्या नावे राजीनामा सादर करणे आवश्यक होते. छिंदम याने दिलेला पदाचा राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी शुक्रवारी रात्री सांगितले होते. २४ तास उलटून गेल्यानंतरही शनिवारी महापालिकेत राजीनामा धडकलाच नाही. त्यामुळे खा. गांधी यांनी केलेली घोषणा अजुन तरी प्रत्यक्षात आली नसल्याचे दिसते.दरम्यान आता खा. दिलीप गांधी यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गांधी विरोधी गटाने लावून धरली आहे. त्यामुळे खा. गांधी यांच्या पदालाही धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाDilip Gandhiखा. दिलीप गांधीShripad Chindamश्रीपाद छिंदम