शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

भाजपचा महापौर करण्यासाठी कर्डिले यांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: June 17, 2016 00:02 IST

अहमदनगर : शिवसेनेने नगरमध्ये महापौर पदाच्या बोहल्यावर चढण्याची तयारी केली असताना भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून वेगळीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

अहमदनगर : शिवसेनेने नगरमध्ये महापौर पदाच्या बोहल्यावर चढण्याची तयारी केली असताना भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून वेगळीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दोन्ही काँग्रेसची साथ घेऊन भाजपचा महापौर करु शकतो, असा प्रस्ताव त्यांनी पक्षस्तरावर मांडला असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपच्याच स्थानिक बहुतांश नगरसेवकांना मात्र हा प्रस्ताव मंजूर नाही. शिवसेनेकडे सध्या स्वत:चे २० तर मनसेचे दोन नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना त्यांनी सहलीवर पाठविले आहे. याशिवाय त्यांनी भाजपचे पाच नगरसेवकही सहलीवर नेले होते. दोन्ही काँग्रेस या पदासाठी इच्छुक नसल्याने सेनेला सहजासहजी महापौरपद मिळेल अशी शक्यता आहे. परंतु ऐनवेळी भाजपकडून वेगळ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सेनेसोबत गेलेल्या नगरसेवकांना भाजपने बोलवून घेतले आहे. पक्षाचा निर्णय होण्याअगोदरच तुम्ही सेनेसोबत कसे गेलात? या कारणावरुन प्रदेशाध्यक्षांनी त्यांना बोलविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नगरसेवकांची मते पक्षाने जाणून घेतल्यानंतर सेनेसोबत जाण्यास बहुतेक नगरसेवकांनी अनुकूलता दर्शविल्याचे या गोटातून सांगण्यात आले. दरम्यान, सेनेला साथ करण्याऐवजी दोन्ही काँग्रेसच्या मदतीने आपलाच महापौर करायचा, असा एक प्रस्ताव भाजपमधील कर्डिले यांच्याकडून पुढे आला आहे. त्यांनी त्यादृष्टीने चाचपणी केली आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला आपण सोबत आणू शकतो, असा त्यांचा दावा असल्याचे समजते. भाजपचा महापौर झाल्यास कर्डिले यांचे पक्षात वजन तयार होऊन मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी त्यांना त्याचा फायदा मिळेल. मात्र, कर्डिले यांचा हा प्रस्ताव भाजपच्या अन्य नेत्यांना मान्य नाही. ‘कर्डिले यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, सेना-भाजप ही पारंपरिक युती असल्याने आम्ही सेनेलाच साथ करणार आहोत. आमचा निर्णय आम्ही प्रदेशलाही कळविला आहे’, असे भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. आमचा निर्णय केवळ उपमहापौर कोणाला करायचे? यावर अडला असून ते नाव रात्री उशिरा जाहीर होईल, असेही या नेत्याने सांगितले. दरम्यान, महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी अखेरची मुदत आहे. आत्तापर्यंत सेनेच्या सुरेखा कदम वगळता कुणीही अर्ज नेलेला नाही. उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवसमहापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाचे वितरण केले जाणार आहे. सेनेच्या कदम वगळल्या तर अन्य कोणत्याच पक्षाकडून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेला नाही. कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतला असला तरी तो दाखल केलेला नाही. युतीच्या नियमानुसार उपमहापौर पद हे भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे उपमहापौर कोण हे तेच ठरवतील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात भाजपमध्येही उपमहापौर पदावरून रस्सीखेच सुरू आहे. महापौर पदासाठी सेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवारचा मुहूर्त काढला खरा पण भाजपकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने सेनेला मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. नगरच्या राजकीय वर्तुळात यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सेना-भाजप युती होणार की तुटणार याचे चित्र स्पष्ट होईल. सेनेने सत्ता स्थापनेसाठीच्या बेरजेत भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. तीन दिवसांपासून सेना-भाजप युती होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐनवेळी युती तोडली तर काय, या दृष्टीने पुढील चालही सेनेने आखली आहे. युती तुटू नये, यासाठी सेनेचे प्रदेश व स्थानिक नेते दोन दिवसांपासून भाजपच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा करीत आहेत.गुरूवारी सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या पत्नी सुरेखा कदम या महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. मात्र भाजप नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी सोबत नसल्याने जनतेत वेगळाच संदेश जाईल. त्यामुळे सेनेच्या कदम यांचा अर्ज गुरूवारी दाखल झाला नाही.