शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिकेतील बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणातील चौकशी अधिकारी बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 16:47 IST

महापालिकेच्या प्रत्येक सार्वजनिक कृतीसाठी शासनाच्या सूचनेनुसार थर्ड पार्टी इन्स्पेक्शन बंधनकारक करण्यात आलेले आहे.

अरुण वाघमोडे

अहमदनगर: महापालिकेच्या बांधकाम विभागात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावे साडेचारशे खोटे टेस्ट रिपोर्ट व खोटे थर्ड पार्टी रिपोर्ट दाखल करून घेत त्याच्या आधारे अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोट्यवधी रुपयांची देयके काढल्या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले असताना या प्रकरणी तत्काळ महापालिकेशी संबंधित चौकशी अधिकारी बदलून महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत सदर प्रकरणाची चौकशी करावी व यामधील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी केली आहे.  

महापालिकेच्या प्रत्येक सार्वजनिक कृतीसाठी शासनाच्या सूचनेनुसार थर्ड पार्टी इन्स्पेक्शन बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे महापालिकेतील बांधकाम विभागामार्फत जी कामे पार पडली जातात त्या प्रत्येक कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन  2010 पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, औरंगाबाद यांच्या मार्फत केले जात होते. मध्यंतरी काळात 2015-16 च्या काळापासून बांधकाम विभागाने थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर यांना प्राधिकृत केले. त्याप्रमाणे त्यांच्याकडील थर्ड पार्टी इन्स्पेक्शन असल्याशिवाय कामाचे देयक अदा केले जाणार नाही, अशा प्रकारच्या अटी व शर्ती नमूद करूनच निविदा प्रसिद्धी केलेल्या आहेत.

2016 ते 2020 च्या दरम्यान एकूण 450 कामांच्या बाबतीत बोगस थर्ड पार्टी इन्स्पेक्शन सर्टिफिकेट उपलब्ध करून करोडो रुपयांची बिले काढल्याचे उघडकीस आलेले आहे. सदर प्रकरणांमध्ये अनेक विभाग समाविष्ट असल्याने हा संगनमताने झालेला मोठा आर्थिक घोटाळा आहे. या गैरप्रकाराबद्दल अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आहे. मात्र पठारे हे मागील पाच वर्षापासून याच महापालिकेत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्फत चौकशी होऊ शकत नाही. सदरचे प्रकरण खूप मोठे असल्यामुळे महापालिकेशी संबंधित कोणत्याही अधिकार्‍याची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येऊ नये, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर