शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ माने यांची मंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:48 IST

आजी, माजी सैनिक पत्नीला सोयीची पदस्थापना देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्वजीत माने यांना असतानाही

अहमदनगर : आजी, माजी सैनिक पत्नीला सोयीची पदस्थापना देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्वजीत माने यांना असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक विनंती बदलीपासून सैनिक पत्नीला वंचित ठेवल्याची तक्रार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे करण्यात आली आहे़ शनिवारी विखे यांनी शेलार यांच्याशी चर्चा करुन यातून तोडगा काढण्याची गळ घातली़जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी शनिवारी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन चर्चा केली़ त्यानंतर विखे, घुले, वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेतील बदल्यांमधील अनागोंदी शिक्षणमंत्री शेलार यांच्यासमोर मांडली़ तसेच बदल्यांबाबत निवेदन देऊन अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली़ या निवेदनात म्हटले आहे, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पार पडलेली आहे. बदली प्रक्रियेबाबत बºयाच शिक्षकांनी तक्रारी केल्या आहेत.आजी / माजी सैनिक पत्नीला आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना देताना प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला व ते अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले़ मात्र, नगर जिल्हा परिषदेत सीईओ माने यांनी माजी सैनिकाच्या पत्नीस सोयीच्या पदस्थापनेपासून वंचित ठेवले आहे़ संगणकीय प्रणालीने संवर्ग १ ते संवर्ग ४ च्या बदल्या झाल्यानंतर पदस्थापना न मिळालेले शिक्षक, मागील वर्षीच्या बदल्यांमध्ये रॅण्डम राऊंडला गेलेले शिक्षक, न्यायालयीन आदेश असलेले शिक्षक, आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेले शिक्षक यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांना होते़जिल्हा स्तरावर या पदस्थापना देताना आजी, माजी सैनिक पत्नी, गरोदर महिला, स्तनदा माता यांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सोयीनुसार पदस्थापना द्यावी असे सरकारचे निर्देश आहेत़ मात्र, हे निर्देश माने यांनी पायदळी तुडविल्याचे म्हटले आहे़ तसेच ग्रामविकास विभागातील सर्वच संवर्गातील जिल्हांतर्गत बदल्यामध्ये महिला कर्मचा-यांना प्राधान्य मिळावे, अशी मागणीही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे़प्रहार दिव्यांगचे सीईओंना निवेदनअरुणा घाडगे यांची कोळगाव केंद्रात सोयीच्या ठिकाणी त्वरित बदली करण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अध्यक्षांनी विनंती करुनही ऐकले नाही. माजी सैनिकाच्या कुटुंबाचाही प्रशासनाला आदर राहिलेला नाही. त्यांची सोयीच्या ठिकाणी बदली न झाल्यास कोळगाव केंद्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पोकळे यांनी दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद