कर्जत : कर्जत येथील सद्गुरू उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवारी गजानन महाराज यांचा प्रकट दिन विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
येथील सद्गुरू उद्योग समूहाने सालाबादाप्रमाणे गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला. सद्गुरू कन्या विद्यालयाच्या मुली व मिरजगाव येथील कृषी विद्यालयाचे विद्यार्थी यांनी गजानन महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी सद्गुरू दूध संघ येथील मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत, मिरजगाव, माहिजळगाव येथील पाच हजार कुटुंबांना घरोघरी जाऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सद्गुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष शंकरराव नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, कल्याणी नेवसे, अर्चना गोरे, मेट्रोचे अध्यक्ष राहुल सोंनमाळी, रवींद्र थोरात, अशोक उबाळे, गणेश म्हेत्रे, अंबर भोसले, लतेश अवसरे, नरेंद्र ढेरे आदीसह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
०५ कर्जत वाटप