शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

अकोलेच्या आदिवासी भागात वाघबारस साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 12:42 IST

‘दिन दिन दिवाळी गाय, म्हशी ओवाळी’या पारंपरिक गीताच्या साथीने ग्रामीण भागात शेतक-यांनी गाय व वासराची पूजा करुन वसुबारस साजरी केली. आदिवासी भागात प्रथेप्रमाणे वाघबारस साजरी झाली अन् दिवाळीला सुरुवात झाली. अकोले शहरातील गुरुवारचा बाजार मतमोजणीमुळे शुक्रवारी भरवण्यात आला होता. दिवाळीची खरेदी त्यात पावसाची रिपरिप यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी अकोलेकरांनी अनुभवली.

अकोले : ‘दिन दिन दिवाळी गाय, म्हशी ओवाळी’या पारंपरिक गीताच्या साथीने ग्रामीण भागात शेतक-यांनी गाय व वासराची पूजा करुन वसुबारस साजरी केली. आदिवासी भागात प्रथेप्रमाणे वाघबारस साजरी झाली अन् दिवाळीला सुरुवात झाली. अकोले शहरातील गुरुवारचा बाजार मतमोजणीमुळे शुक्रवारी भरवण्यात आला होता. दिवाळीची खरेदी त्यात पावसाची रिपरिप यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी अकोलेकरांनी अनुभवली.आदिवासी भागातील चालीरीतीप्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’ होय. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा दिवस असून तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा उत्सवाने जपली जात आहे. आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानले असून गावाच्या वेशीला वाघ्याच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. एकत्र नवसपूर्ती केली जाते. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांचे गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा गोड नैवेद्यही दाखवला जातो.अकोले तालुक्यातील म्हैसवळण घाट, घाटघर कोकणकडा, पिंपरकणे, बिताका, शेणीत, खिरविरे, रतनवाडी, घाटघर, हरिश्चंद्रगड पायथा, पेठ्याची वाडी, देवगाव, झुल्याची सोंड अशा बहुतांशी ठिकाणी वाघोबाची वा वाघदेवाची मंदिरे आहेत. तर काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून त्यावर शेंदूर लावून ती या ठिकाणी ठेवलेली आढळतात. पेठेच्या वाडीजवळील भैरवनाथाच्या कलाड गडावर गावकरी जातात.  नैवेद्य दाखवितात. पाचनई जवळ कोड्याच्या कुंडातील झ-याजवळही अशाच पद्धतीने वाघबारस साजरी होते. वाघबारसेच्या दिवशी येथील प्रत्येक घरातून नैवेद्य द्यावा लागतो. वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. गावातील जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात. वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते.  रांगोळी व फुलांच्या माळा लावल्या जातात. देवांना शेंदूर लावला जातो. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाते. गुराखी मुले वाघ, अस्वल, कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते. तेलाचा किवा तुपाचा दिवा लावला जातो.  सर्व प्राण्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य खाऊ घातला जातो. आदिवासी तरुण व तरूणी एकत्र जमून तारपक-याच्या तालावर नाचतात.

टॅग्स :AkolaअकोलाAhmednagarअहमदनगर