शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रू व्होटर अ‍ॅप’ न वापरल्यास उमेदवारांची ‘घंटी’ वाजवणार :निवडणूक आयोग ठेकेदाराचे आक्षेपार्ह वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:17 IST

उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’चा वापर न केल्यास त्यांची ‘घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य राज्य निवडणूक आयोगाचे खासगी ठेकेदार मुरलीधर भुतडा यांनी नगरमध्ये केल्याने उमेदवार व अधिका-यांमध्ये

अहमदनगर : उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’चा वापर न केल्यास त्यांची ‘घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य राज्य निवडणूक आयोगाचे खासगी ठेकेदार मुरलीधर भुतडा यांनी नगरमध्ये केल्याने उमेदवार व अधिका-यांमध्ये संताप व्यक्त होत असून, या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.नगरमध्ये ९ डिसेंबरला महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने उमेदवारांची अर्ज प्रक्रिया, चिन्हवाटप झाल्यानंतर उमेदवार निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, निवडणुकीमध्ये उमेदवारांनी दैनंदिन होणा-या खर्चाची माहिती ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’द्वारे भरावी, अन्यथा उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.दरम्यान, उमेदवारांनी हा खर्च ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’द्वारे कसा भरावा याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे ते निवडणूक आयोगाचे खासगी ठेकेदार मुरलीधर भुतडा उपस्थित होते.

प्रत्येक उमेदवाराने याच अ‍ॅपद्वारे खर्चभरावा, अन्यथा उमेदवार व अधिका-यांची ‘घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य भुतडा यांनी केले.प्रशिक्षण वर्गात निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना धमकी देताना अधिकारी व कर्मचारी यांना उद्देशून अत्यंत अश्लील,असभ्य व असंसदीय शब्द प्रयोग केल्यामुळे सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी संतप्त झाले. सदर प्रशिक्षण वर्गात अनेक महिला अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.भुतडा यांचा ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’चा ठेका तातडीने रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावीलागेल, अशी मागणी कराळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.माफी मागण्याची मागणीभुतडा यांच्या असंसदीय भाषेच्या वापराबाबत सर्व अधिकारी अवाक झाले असून त्यांचा सर्व स्थरांतून निषेध होत आहे. भुतडा यांनी आपल्या वक्तव्याबाबत तात्काळ जाहीर लेखी माफी मागावी, अशी मागणी अनेक कर्मचारी-अधिकाºयांनी केली. या वक्त्यव्याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘लोकमत’ने भुतडा यांच्याशी संपर्क केला, मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका