शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार मोनिका राजळेंसाठी कार्यकर्त्यांनी काढली उमेद दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 19:46 IST

माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनामुळे दु:खित झालेल्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे.

ठळक मुद्देमोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे.तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी अकरा वाजता तारकेश्वर गडावर झाला. यावेळी महंतांनी उमेद कार्ड मोनिका राजळे यांना पाठवले आहे.

कोरडगाव (ता. पाथर्डी) : माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनामुळे दु:खित झालेल्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे.सहभागी व्हावे यासाठी पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या विविध संस्थांच्या वतीने काढण्यात येणा-या उमेद दिंडीचा शुभारंभ तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी अकरा वाजता तारकेश्वर गडावर झाला. यावेळी महंतांनी उमेद कार्ड मोनिका राजळे यांना पाठवले आहे. यावेळी पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, पं.स. उपसभापती विष्णूपंत अकोलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, पं.स. सदस्य सुनील ओव्हळ, गोकुळ दौंड, एकनाथ आटकर, दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष विजयकुमार मंडलेचा, अजिनाथ खेडकर, शिवाजीराव माहिते, बाळासाहेब गोल्हार, नगरसेवक नामदेव लबडे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आठरे, पं.स. सदस्य सुनील परदेशी, रवींद्र्र वायकर, खरेदी विक्रीचे संघाचे उपाध्यक्ष उत्तमराव गर्जे, रमेश घुले, मोहाज देवढेचे सरपंच गणेश चितळकर, अकोलेचे उपसरपंच नारायण पालवे उपस्थित होते.

दिंडी आठवडे बाजार, मोठ्या गावांमधून फिरणार

उमेद दिंडी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील आठवडे बाजार व मोठ्या गावांमध्ये फिरणार आहे. दिंडी समवेत असलेल्या एकावन्न हजार उमेद पोष्ट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. या पोष्ट कार्डवर मोनिका राजळे यांना राजकीय बळ देणारे संदेश लिहून ते कार्ड पोष्टाद्वारे पाठवावेत, असे आवाहन माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर यांनी केले. उमेद दिंडीच्या फ्लेक्सवर मोनिका राजळे व पंकजा मुंडे यांचे छायाचित्र आहे. पं.स.सदस्य सुभाष केकाण यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीBJPभाजपाMonika Rajaleआ. मोनिका राजळे