शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी बसपाचे मुदस्सर शेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 12:11 IST

महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख यांची आज निवड झाली. शेख यांना भाजपाने पुरस्कृत केले होते.

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख यांची आज निवड झाली. भाजपा-राष्ट्रवादी-बसपा अशी आघाडी महापालिकेत कायम राहिली. त्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला.शिवसेनेचे योगिराज गाडे यांना शिवसेनेची सर्वच्या सर्व ६ मते मिळाली.

अहमदनगर - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख यांची आज निवड झाली. शेख यांना भाजपाने पुरस्कृत केले होते. भाजपा-राष्ट्रवादी-बसपा अशी आघाडी महापालिकेत कायम राहिली. त्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला.१६ सदस्य असलेल्या स्थायी समितीच्या सभागृहात शेख यांना भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा या पक्षाच्या एकूण १० जणांनी मतदान केले. शिवसेनेचे योगिराज गाडे यांना शिवसेनेची सर्वच्या सर्व ६ मते मिळाली.

महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाने बसपाचे शेख यांना पुरस्कृत केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविनाश घुले यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजप-शिवसेनेचे जुळले नसल्याने शिवसेनेने नगरसेवक योगिराज गाडे यांना मैदानात उतरविले. गाडे हे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजीव आहेत. गाडे यांनी भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. महापौर बाबासाहेब वाकळे यांना शेख यांच्यासाठी राष्ट्रवादीचे समर्थन मिळविण्यात यश आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे घुले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे शेख (बसपा) आणि गाडे (शिवसेना) यांच्यात थेट लढत झाली. १६ सदस्यांच्या सभागृहात शेख यांना १० मते मिळाली, तर गाडे यांना ६ मते मिळाली.

जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत निवडणूक पार पडली. महापालिकेत सध्या राष्ट्रवादी व बसपाच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आधीच शब्द दिले असल्याने बसपाला सभापती पद दिल्याचा दावा भाजपाने केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAhmednagarअहमदनगर