शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपोषण मागे घ्या : अशोक विखेंना  पोलिसांची विनंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 19:45 IST

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संस्थामधील काही प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ़ अशोक विखे यांना पोलिसांनी उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली आहे़

अहमदनगर: विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संस्थामधील काही प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ़ अशोक विखे यांना पोलिसांनी उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली आहे़ याबाबत लोणी पोलिसांनी विखे यांना गुरुवारी नोटीस दिली आहे़ अशोक विखे मात्र उपोषणावर ठाम असून तसे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे़  राधाकृष्ण विखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या  खासगी, सहकारी आणि त्यांची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी २० मे रोजी लोणी प्रवरा येथील पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे़ याबाबत जिल्हाधिकाºयांना  निवेदनही देण्यात आले आहे़  प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकºयांना उसाचे पैसे मिळावेत, झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फौंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी, जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराचा तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी, जिल्हा परिषदेत २००४ ते २००९ या काळा झालेल्या शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराची चौकशी करावी, श्रीरामपूरच्या मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी, या संस्थेला सरकारकडून मिळालेली रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करावी, या मगण्यांसाठी अशोक विखे यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे़ कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिने डॉ़ अशोक विखे यांना नोटीस देऊन आपल्या स्तरावर उपोषण मागे घ्यावे अशी विनंती प्रशासनाच्यावतीने त्यांना केली आहे़  ते उपोषणावर ठाम राहिले तर २० मे रोजी लोणी येथे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिने योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे लोणी पोलिस ठाण्याचे निरिक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSujay Vikheसुजय विखे