शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याकडून लाच घेणारा लिपिक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 19:11 IST

जमिनीची मोजणी करून नकाशा देण्यासाठी शेतक-याकडून दहा हजार रुपयांची लाच घेणा-या श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला शनिवारी (दि़७) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली़ 

अहमदनगर: जमिनीची मोजणी करून नकाशा देण्यासाठी शेतक-याकडून दहा हजार रुपयांची लाच घेणा-या श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला शनिवारी (दि़७) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली़ बाबूराव यादव राशीनकर (वय ५५) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे़ तक्रारदार शेतकºयाला त्याची भोकर (श्रीरामपूर) येथील शेतजमीन बिगरशेती करून घेण्यासाठी मोजणी करून नकाशा हवा होता़ यासाठी त्यांनी ३० जून रोजी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता़ त्यासाठी त्यांनी शासकीय शुल्कही भरले होते़ हा अर्ज कार्यालयाकडून रद्द झाला होता़ याबाबत शेतक-याने राशीनकर याची भेट घेतली तेव्हा त्याने पुन्हा चलन भरून देण्याचे सांगत २० हजार रुपयांची लाच मागितली़ याबाबत सदर शेतक-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली तेव्हा राशीनकर याने सदर शेतक-याकडून तडजोडीअंती भूमिअभिलेख कार्यालयात दहा हजार रुपये स्वीकारले़ यावेळी पथकाने राशीनकर याला रंगेहात अटक केली़ ही कारवाई पोलीस उपाधीक्षक हरिष खेडकर, निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे, हेड कॉन्स्टेबल तनवीर शेख, पोलीस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने केली़ 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर