शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळला आईसह मुलीचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 19:48 IST

कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे हंगा नदीजवळील विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आढळून आला.

विसापूर : कोरेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे हंगा नदीजवळील विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आढळून आला. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा घातपात असावा असा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. गणेश परशुराम आढाव हे वडील, पत्नी, मुलगीसह कोरेगव्हाण येथे राहत होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नी व मुलगी घरातून बाहेर पडल्याचे पती गणेश आढाव यांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी ग्रामस्थ, विवाहितेच्या नातेवाईकांनी कोरेगव्हाण येथे शोध घेतला. गणेश आढाव याच्या घराच्या मागे हंगा नदी तिरा जवळ विहिरीजवळ विवाहितेच्या चप्पला आढळून आल्या. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता विवाहिता व मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. हा घातपात असावा असा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी