पाथर्डी : शहरातील तहसील कार्यालयात असलेल्या मंडळ अधिकारी कक्षातील टाकळीमानूर परीक्षेत्राचे मंडळ अधिकारी बी.के गायकवाड यांना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सात बारावरील फेरफारची नोंद प्रमाणित करण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.मंडळ अधिकारी गायकवाड यांच्या निवृत्तीला अवघे काही महिने राहिले होते. लाचलुचत विभागाच्या कारवाइची बातमी समजताच तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी यांनी कार्यालयातून पळ काढला.
तीन हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 15:28 IST