शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

लातूरच्या युवतीचा नगरमध्ये खून

By admin | Updated: May 27, 2016 23:26 IST

अहमदनगर : नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील जुना जकात नाका परिसरात इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन तरुणीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला.

अहमदनगर : नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील जुना जकात नाका परिसरात इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन तरुणीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. शुक्रवारी अकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी स्वत:हून पोलिसांत हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. प्रदीप माणिक कनसे (व्यवसाय-चालक, रा. ताळणी, ता.रेणापूर, जि.लातूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोहिनी तान्हाजी सूर्यवंशी (रा. हाडगा, ता. निलंगा, जि.लातूर) असे मृत अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. तीर्थप्रसाद ज्ञानोबा आनंतवाड यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. लातूर जिल्ह्यातील बोरी गावचे आनंतवाड हे नोकरीनिमित्त नगर येथील बुरूडगाव रस्त्यावरील आठरे निवास इमारतीत राहत होते. आनंतवाड हे मृत मोहिनीचे काका आहे. मोहिनी ही मावशीकडे आली होती. शुक्रवारी सकाळी आरोपी प्रदीप हा त्यांच्या घरी गेला. घराच्या छतावर प्रदीप याने मोहिनीच्या डोके, गालावर व दोन्ही हातावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात ती जागीच ठार झाली. घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, पाटील, करेवाड यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा बुरूडगाव रस्त्यावरील आठरे इमारतीत पोहचला. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मृत मोहिनीच्या आई-वडिलांना कळविले असून ते नगरला आल्यानंतरच खुनाचे कारण समजू शकेल अशी माहिती पोलीस निरीक्षक मालकर यांनी दिली.पोलिसांच्या माहितीनुसार तीर्थप्रसाद आनंतवाड हे एमआयडीसीत नोकरीला असून त्यांची पत्नी राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून सेवेत आहे. घटना घडली त्यावेळी आनंतवाड पती-पत्नी दोघेही घरात नव्हते. ते नोकरीसाठी गेले होते. आरोपीची माहिती व आनंतवाड यांच्या माहितीत विसंगती असल्याने नेमक्या कोणत्या कारणातून मोहिनी सूर्यवंशीचा खून झाला या कारणापर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत.