शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकेबंदी उभारण्यात आले आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकेबंदी उभारण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे.पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकेबंदी उभारण्यात आले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासूननगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे चेक नाका सुरू करण्यात आला आहे. महारटाकळी येथील शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीसाठी राहुटी लावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच येथील परिसराचा त्यांनी आढावा घेतला. महारटाकळी येथे नगर व बीड जिल्ह्याची सरहद्द असल्याने यामार्गे अवैध दारू, अवैध पैसे, इत्यादी जाण्याची दाट शक्यता असल्याने ही नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची रात्रंदिवस तपासणी चालू करण्यात आली आहे. नाकेबंदी लोकसभा निवडणूक संपेपर्यंत चालणार आहे. या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच वायरलेस संदेश यंत्रणा ही बसवण्यात आलेली आहे. शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर नगर व बीड या दोन्ही जिल्ह्याच्या सरहद्दिवर महारटाकळी येथे चेक नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करताना पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब शिरसाठ,पोलीस कॉन्स्टेबल महेश रुईकर,पोलीस कॉन्स्टेबल विजय तिडके,पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरElectionनिवडणूक 2024Policeपोलिस