शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये ‘अंधा कानून’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 12:39 IST

असे म्हणतात कायदा सर्वांनाच सारखा असतो़ माजी आमदार अनिल राठोड मात्र याला अपवाद ठरले आहेत. केडगाव तोडफोड प्रकरणात राठोड यांच्यावर गुन्हा दाखल आहे़. पोलीस मात्र त्यांना अटक करण्याचे सोडून त्यांच्याच मांडीला मांडी लावून चर्चा करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांचा कायदा पक्षपातीराठोड पोलिसांसमोर असूनही कागदावर फरार

अहमदनगर : असे म्हणतात कायदा सर्वांनाच सारखा असतो़ माजी आमदार अनिल राठोड मात्र याला अपवाद ठरले आहेत. केडगाव तोडफोड प्रकरणात राठोड यांच्यावर गुन्हा दाखल आहे़. पोलीस मात्र त्यांना अटक करण्याचे सोडून त्यांच्याच मांडीला मांडी लावून चर्चा करताना दिसत आहेत. राठोड आणि पोलीस अधिकाऱ्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर घटनास्थळी जमावाने मोठी तोडफोड केली. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी राठोड यांच्यासह इतर ६०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक केली असून, त्यांना जामीनही मिळाला आहे.राठोड यांना मात्र पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली नाही़ कायदा हा सर्वांनाच सारखा असेल तर राठोड यांना पोलिसांकडून का अभय मिळत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. केडगाव येथे मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील हे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेथे राठोड उपस्थित होते. राठोड यांनी पाटील यांच्या शेजारी बसून चर्चा केली. उपोषण सुटल्यानंतर पोलीस अधिकारी निघून आले तर राठोडही निघून गेले. पोलिसांच्या या कृतीवर ‘ये अंधा काूनन है’ असेच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड