शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

अहमदनगर महापालिका त्रिशंकू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 12:02 IST

नगर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी कबूल केले आहे.

- सुधीर लंके

अहमदनगर -  नगर शहर आजवर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी जाहीरपणे कबूल केले आहे. हेच पक्ष पुन्हा सत्ता आली तर आता विकास करुन दाखवू, असेही दावे करत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मतदारच संभ्रमात सापडल्याची चिन्हे आहेत. विकासाबाबत अपेक्षाभंग झाल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही. पक्ष स्वबळाचे दावे करत असले तरी ठोस व विश्वासार्ह पर्याय समोर दिसत नसल्याने महापालिका त्रिशंकू राहण्याची शक्यताच विविध सर्वे व राजकीय जाणकार वर्तवत आहेत. 

महापालिकेत प्रथमच सेना व भाजपा स्वतंत्रपणे लढत आहेत, तर दोन्ही कॉंग्रेसची आघाडी आहे. प्रचारात भाजपा आघाडीवर दिसतो. ‘नगर बदलणार’ असे फलक त्यांनी शहरभर लावले असून राम शिंदे, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, दिलीप कांबळे या मंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही प्रचार सभा घेतली आहे. अखेरच्या टप्प्यात स्वत: मुख्यमंत्री प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले जाते. भाजपाने सर्व ६८ जागांवर उमेदवार दिले. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ असा या पक्षाचा दावा आहे. 

मात्र, भाजपाच्या दृष्टीने काही मुद्दे अडचणीचे ठरले आहेत. केडगावमध्ये भाजपाने कोतकर समर्थकांना पक्षात पावन करुन घेतले. कोतकर व मोदी यांची छायाचित्रे सोबत झळकली. कोतकर जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे मोदी व त्यांचे एकत्रित छायाचित्र शोभते का? असा प्रश्न सेनेने प्रचारात उपस्थित केला. भाजपाने या मुद्याची दखल घेत अशी छायाचित्रे न वापरण्याचा आदेश दिला आहे. ‘आमच्याकडे महापौर पद द्या, शहराला ३०० कोटी रुपये देऊ’ अशी घोषणा भाजपने केली. पण, हा मुद्दा भाजपाला सोयीचा ठरण्यापेक्षा अडचणीचा अधिक ठरला. राज्यात व केंद्रात सत्ता असताना आजवर हा निधी का दिला नाही? असा प्रश्न सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या सर्वांनीच उपस्थित केला. त्याचे समर्थनीय उत्तर भाजपाने दिलेले नाही. 

भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले व अभय आगरकर हे  नेते निवडणुकीत एकत्र आहेत. पण, इतरवेळी हेच नेते एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यामुळे या एकीच्या देखाव्यावर मतदार किती विश्वास दाखवितात? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मोदी लाट आहे म्हणून पक्ष कार्यकर्ता नसलेल्यांनीही भाजपाची उमेदवारी घेतली. परिणामी भाजपातच अंतर्गत धुसफूस आहे.  शिवसेनेबाबतही अनेक प्रश्न आहेत. सेनेने आजवर नगर शहरात काहीच विकास केला नाही, असे भाजपाच प्रचार सभांमधून सांगत आहे. सेनेने पुन्हा एकदा ‘भयमुक्ती’चा जुनाच नारा दिला. सेनेच्या प्रचारासाठी आजवर केवळ नितीन बानगुडे यांनी हजेरी लावली. इतर नेते अजून आलेले नाहीत. उद्धव ठाकरे दोन महिन्यांपूर्वी येऊन गेले. केडगाव हत्याकांडाचा मुद्दा सेना मांडत आहे. हिंदुत्व, भावनिक राजकारण आणि केडगाव या पारंपरिक मुद्यांवर आपणाला सहानुभूती मिळेल, अशी सेनेची अपेक्षा आहे. आघाडीत राष्ट्रवादी ४१ तर कॉंग्रेस २१ जागांवर लढत आहे. आघाडी स्वबळाचा नारा देत असली, तरी त्यांनाही स्वबळ गाठणे सोपे दिसत नाही. केडगावमध्ये दोन्ही कॉंग्रेसचे ८ इच्छुक भाजपामध्ये गेल्याने आघाडीला दणका बसला. भाजपाचे आमदार व कोतकर यांचे सोयरे शिवाजी कर्डिले हे स्वत: केडगावमध्ये भाजपाच्या प्रचारात उतरले आहेत. केडगावने भाजपाला कौल दिल्यास आघाडीचे ते मोठे नुकसान ठरेल. त्यामुळे अंदाज वर्तवणे अवघड आहे. 

मुख्यमंत्री जळगाव, सांगलीची पुनरावृत्ती नगरला करू पाहत आहेत. मात्र, नगरला तशी पुनरावृत्ती होईल का? याबाबत साशंकता आहे. मुख्यमंत्री अखेरच्या टप्प्यात काय जादुची कांडी फिरवितात ? हे महत्त्वाचे राहील. 

त्रिशंकू परिस्थिती?

नगरकरांची सध्याची मानसिकता पाहता कुणा एका पक्षाकडे एकहाती सत्ता जाईल, अशी शक्यता दिसत नाही. तशी विश्वासार्ह प्रतिमा या टप्प्यापर्यंत कुठलाही पक्ष निर्माण करु शकलेला नाही. गत विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना यांच्या मतविभागणीचा राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यावेळीही तशीच परिस्थिती आहे.

टॅग्स :BJPभाजपा