शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नगर विधानसभेची जागा भाजपलाच घेणार-दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:45 IST

नगरची जागा भाजपच लढविणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे, असे गांधी यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास बदलण्यासाठी बदल हवा आहे, असे माजी खासदार दिलीप गांधी म्हणाले.

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या विकासाला ३०० कोटी देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे नगर शहरात मुख्यमंत्र्यांचे शाही स्वागत करण्याचे नियोजन माजी खासदार दिलीप गांधी यांनी केले आहे. नगरची जागा भाजपच लढविणार असून याबाबत मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार आहे, असे गांधी यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांचा काळा इतिहास बदलण्यासाठी बदल हवा आहे, असेही गांधी म्हणाले.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात येत आहे. शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजता शहरातून रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गांधी चांगलेच आक्रमक झाले होते. भाजपकडून सात ते आठजण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा फैसला वरिष्ठ घेतील,मात्र आधी ही जागा भाजपलाच घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. जागा तर भाजपलाच मिळणार आहे, यात शंका नाही. मात्र युती म्हणून अनिल राठोड यांना उमेदवारी देणार असाल तर त्याला पहिला आमचा विरोध राहील. राठोड यांना गांधी चालत नसेल तर गांधी यांनाही राठोड अजिबात चालणार नाही. गेल्या २५ वर्षांत कोणताही विकास कामे झाली नाहीत. शहरात उद्योग आले नाहीत. रोजगार मिळाला नाही. त्यामुळे शहरात आता बदल हवा आहे. बदल घडविण्यासाठी नगर विधानसभाचे जागा भाजपलाच मिळणे गरजेचे आहे. असेही गांधी यांनी सांगितले.दरम्यान महाजनादेश यात्रेचे शाही स्वागत करण्यात येणार आहे. हत्ती, घोडे, तुतारी, सनई, चौघडा, कमानी, पुष्पवृष्टी अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार असून त्यादृष्टीने जोरदार तयारी करण्यात येत आहे.

टॅग्स :Dilip Gandhiखा. दिलीप गांधीBJPभाजपा