शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, छिंदमच्या निषेधार्थ दुस-या दिवसीही ठिकठिकाणे आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:48 IST

 जिल्हाभरात ठिकठिकाणी बंद पाळून व मोर्चे काढून भाजप आणि छिंदमचा निषेध केला जात आहे. नगर महापालिकेत छिंदम याचे नाव असलेले फलक शिवसैनिकांनी फाडून टाकले. दरम्यान परिस्थिती चिघळू नये, म्हणून तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या विरोधात जिल्हाभरात दुस-या दिवशीही आंदोलने सुरुच असून भाजपावरही जोरदार टीका या आंदोलनांमधून केली जात आहे. जिल्हाभरात ठिकठिकाणी बंद पाळून व मोर्चे काढून भाजप आणि छिंदमचा निषेध केला जात आहे. नगर महापालिकेत छिंदम याचे नाव असलेले फलक शिवसैनिकांनी फाडून टाकले. दरम्यान परिस्थिती चिघळू नये, म्हणून तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.छिंदमच्या विरोधात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे गावातून तरुणांनी मोर्चा काढला. विसापूर परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवून छिंदम व भाजपचा निषेध करण्यात आला. विसापूर येथे छिंदम याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच गावात निषेध सभा घेण्यात आली. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच छिंदमच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. छिंदम याच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

नेवाशात पोलीस ठाण्यात ठिय्या

नेवासा येथे राष्ट्रवादी काँगे्रस, क्रांतीकारी शेतकरी पक्ष, काँगे्रस तसेच शिवप्रेमी संघटनांनी गणपती मंदिर चौकात छिंदम याचा पुतळा जाळला़ त्यानंतर सर्व जमाव मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर पोहोचला़ तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहोचला़ तेथे छिंदम याच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा मोर्चेकºयांनी दिला़ वकील संघटनेनेही छिंदम याच्या विरोधात फिर्याद दाखल करुन घेण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केले़ पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे छिंदम याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

भिंगारमध्ये कडकडीत बंद

छिंदम याच्याविरोधात शुक्रवारी भिंगार शहरात विविध संघटनांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार सर्वांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. छिंदम याच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला. अनुसूचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भिंगारमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमAhmednagarअहमदनगरBJPभाजपा