शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भाजपनेच लांबविली गटनोंदणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:04 IST

नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने रजेवर असल्याचे कारण पुढे करून राजकीय पक्षांनीच गटनोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे.

अहमदनगर : नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने रजेवर असल्याचे कारण पुढे करून राजकीय पक्षांनीच गटनोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी नवे पर्याय मिळावेत, यासाठी जाणीवपूर्वक ही गटनोंदणी लांबविल्याची चर्चा आहे.महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुमतासाठी ३५ नगरसेवक कोणत्याही एका पक्षाकडे असणे आवश्यक आहे. शिवसेना २४ जागा जिंकून सर्वाधिक पक्ष ठरला असला तरी अन्य कोणत्याही एका पक्षाचा पाठिंबा मिळविण्याशिवाय सेनेसमोर पर्याय नसल्याचे दिसते. नैसर्गिक युती झाल्यास शिवसेना-भाजप या दोन पक्षांचे मिळून ३८ नगरसेवक होतात. मात्र स्थानिक पातळीवरील सेना-भाजपच्या नेत्यांचे सख्य नसल्याने शिवसेना किंवा भाजपसमोर अन्य पर्याय शोधण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी ही गटनोंदणी जाणीवपूर्वक लांबविल्याची चर्चा आहे.नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने हे दोन दिवस रजेवर आहेत. हेच कारण पुढे करून सर्वच पक्षांनी गटनोंदणी सोमवारी (दि. १७)करण्याचा निर्णय घेतला. विभागीय आयुक्त रजेवर असले तरी वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांकडून गटनोंदणी करून घेता येते. कोणी रजेवर आहे म्हणून काम थांबत नाही, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. गटनोंदणी ही संबंधित पक्षांशी संंबंधित आहे. त्यामुळे गटनोंदणीच्या प्रक्रियेचा महापौर निवडीच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नाही. विभागीय आयुक्त किंवा समकक्ष अधिकाºयांच्या उपलब्धततेवर महापौर निवडीची तारीख जाहीर होणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान माने हे रजेवर जाण्यामागे भाजपची काही खेळी तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित झाली आहे. सोमवारपर्यंत भाजपही राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा करून नवा पर्याय देण्याबाबत चर्चा करू शकते.महापौर झाला तरच....‘महापौर झाला तरच महापालिकेला तीनशे कोटी देऊ’,असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगर येथील सभेत दिले होते. महापालिकेत बहुमत आले तरच असा शब्दप्रयोग त्यांनी केला नव्हता. बहुमत नसले तरीही महापौर हा भाजपचा होऊ शकतो, असेच त्यांना त्यावेळी म्हणायचे होते, असा त्यांच्या विधानाचा अर्थ आता काढला जात आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी-बसपा असे समीकरणही चर्चेत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका