शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदार दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 15:03 IST

भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिलीप गांधी यांच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी पैशाची मागणी केली असून सुमारे ५० लाख रुपयांची खडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नगरमधील फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशनुसार शनिवारी  भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबाद खंडपीठाने खासदार गांधी यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते. तसेच या गुन्हाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, असेही औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. २९ सप्टेंबर २०१५ रोजी बिहाणी यांना खंडणी मागितली गेल्याचे बिहाणी यांचे म्हणणे आहे. दिलीप गांधी यांच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी पैशाची मागणी केली असून सुमारे ५० लाख रुपयांची खडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बाबतचे सर्व कॉल रेकॉर्ड फोन मेसेज बिहानी यांनी पोलिसांना दिले आहेत. या चार ही जनांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.ही घटना घडली तेंव्हा फोर्ड शो रूमचे मालक भूषण बिहानी हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र तेथे त्यांना दाद न मिळाल्याने बिहानी यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामध्ये कोर्टाने दिलीप गांधी यांच्यासह त्यांच्या पुत्रवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Dilip Gandhiखा. दिलीप गांधीAhmednagarअहमदनगरBJPभाजपा