शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना पॅकेज हवे; नगरमध्ये कारखानदारांची गुप्त बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:22 IST

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत. 

अहमदनगर : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत. 

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरमधील विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या परिसरात शनिवारी बैठक झाली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे साखर कारखानदार उपस्थित होते.

अतिशय गोपनीय झालेल्या या बैठकीत फक्त कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचाच विषय होता. या बैठकीला माजीमंत्री राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, राहुल कूल, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १५ साखर कारखान्यांचे प्रमुख उपस्थित होते.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. अनेक कारखान्यांवर बँकांचे कर्ज आहे. लॉकडाऊननंतरही परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, याची शक्यता नाही. या कारखान्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षा व्यर्थ आहे. त्यामुळे कारखान्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळण्याची गरज आहे, याची बैठकीत चर्चा झाली. याबाबतचे एक अंदाजपत्रक निश्चित करण्यासाठी दानवे यांनी विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली.  प्रस्ताव तयार केल्यानंतर तो अर्थमंत्रालयाला सादर केला जाणार आहे. विशेषत: जे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत, अशा आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचे साखर कारखान्यांचाच विषय बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे जे सध्या भाजपात आहेत, असेच कारखानदार बैठकीला उपस्थित होते.

साखर कारखान्यांसह रोजगार, राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. हे प्रश्न पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी या बैठकीत दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने