शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने; हा देशासाठी सर्वात मोठा धोका : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 16:38 IST

लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपा सरकारने केला आहे. सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपा सरकारने केला आहे.सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे.हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काहीही ठोस पावले उचलत नाही. सरकारला जशी उद्योगपतींची काळजी आहे, तशी शेतक-यांची नाही.

राळेगणसिद्धी : लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपासरकारने केला आहे. सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.२३ मार्च २०१८ रोजी दिल्लीमध्ये शहिद दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी अण्णांनी कार्यकर्त्यांना एक पत्र पाठविले आहे. त्या पत्रात म्हटले आहे, लाखो शेतक-यांनी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांबाबत सरकार काहीही बोलत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काहीही ठोस पावले उचलत नाही. सरकारला जशी उद्योगपतींची काळजी आहे, तशी शेतक-यांची नाही.भ्रष्टामुक्तीसाठी बनविलेले लोकपाल, लोकायुक्त विधेयकातील नियम ४४ मध्ये सरकारने बदल करुन हे नियम ४४ काढून टाकले आहे. त्यामुळे आता सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना भ्रष्टाचारासाठी मोकळे रान मिळाले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकारात २७ जुलै २०१६ रोजी लोकसभेत कोणत्याही चर्चेशिवाय नियम ४४ चा नियम रद्द ठरविला. त्यानंतर २८ जुलै रोजी राज्यसभेत एका दिवसात हे लोकपाल, लोकायुक्त विधेयकाला कमजोर बनविणारा कायदा संमत केला. त्यानंतर दुस-याच दिवसी म्हणजे २९ जुलैला राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. केवळ तीन दिवसात कोणत्याही चर्चेशिवाय हा कायदा करण्यात आला. सरकारची ही हुकूमशाहीकडे वाटचाल आहे आणि देशासाठी हा सर्वात मोठा धोका आहे. म्हणूनच लोकपाल, लोकायुक्त सक्षम करण्यासाठी २३ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे, असे सांगत अण्णांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेGovernmentसरकारBJPभाजपा