शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप- सेना साथ-साथ - प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:00 IST

महाराष्ट्रात शिवसेना व भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे दोघेही साथ-साथच आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर : महाराष्ट्रात शिवसेना व भाजप सरकारमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे दोघेही साथ-साथच आहेत आणि पुढेही राहतील, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.मंत्री जावडेकर यांनी शनिवारी खा. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त सुशासनाचा अनुभव लोकांना येत आहे. म्हणूनच कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळत आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाले होते, त्यावेळी भाजपची सत्ता सहा राज्यात होती, तर काँग्रेसची सत्ता १७ राज्यात होती. आता भाजपची सत्ता २० राज्यात असून काँग्रेस तीन ठिकाणी राहिली आहे. यावरून पंतप्रधान मोदी यांचा कारभार जनतेला आवडला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळेच अनेक निवडणुकांमध्ये पक्षाला यश येत असून नाशिक शिक्षक मतदारसंघातही भाजपचा उमेदवार निवडून येईल. सर्वांची महाग शिक्षणापासून सुटका करण्यासाठी खासगी संस्थांमध्ये डोनेशनवर बंदी असून डोनेशन घेणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करेल, असा इशाराही जावडेकर यांनी दिला. ‘पवित्र’ हे अ‍ॅप केंद्र शासनाच्याच धोरणाचा भाग असून त्याची राज्यातही अंमलबजावणी केली जाईल. सर्वच ठिकाणचे दलाल हद्दपार केले असून भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचा प्रयत्न आहे. केंद्रातील एकाही मंत्र्यांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आरोप होतात, याकडे लक्ष वेधले असता जावडेकर म्हणाले, खोटे बोलून पण रेटून बोल अशी विरोधकांची स्थिती आहे. देवस्थानावर सरकारचे नियंत्रण आणण्यामागे भक्तांच्या हिताचा विचार केला आहे. यामागे देवस्थानावर सत्ता मिळविण्याचा अजिबात हेतू नाही, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. वन विभागाच्या जमिनीवर कार्पोरेट प्रोजेक्ट उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. छावणी मंडळाच्या अखत्यारीत रस्ते लोकांसाठी खुले केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचीही आकडेवारी सादर केली. जावडेकर यांनी शिक्षक मतदार संघाच्या प्रचाराचाही सारडा महाविद्यालयात आढावा घेतला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना