शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: दुधाच्या टँकरवर दुचाकी धडकून भीषण अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By शिवाजी पवार | Updated: May 3, 2023 12:18 IST

Ahmednagar: श्रीरामपूर नेवासा महामार्गावर वडाळा महादेव दुधाच्या टँकरचा टायर फुटल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची त्याला धडक बसून तरुण जागीच ठार झाला. या दुर्घटनेत एक रिक्षाही रस्त्याच्या बाजूला उलटली. मात्र रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.

 - शिवाजी पवार

अहमदनगर -  श्रीरामपूर नेवासा महामार्गावर वडाळा महादेव दुधाच्या टँकरचा टायर फुटल्याने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची त्याला धडक बसून तरुण जागीच ठार झाला. या दुर्घटनेत एक रिक्षाही रस्त्याच्या बाजूला उलटली. मात्र रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.

मंगळवारी रात्री हा अपघात झाला. मयत दुचाकीस्वाराचे नाव बाबासाहेब चंद्रकांत रणदिवे (वय २४, रा.वॉर्ड क्रमांक ६, श्रीरामपूर) असे आहे. या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

टँकरचा (एमएच १४ डीएम ६८९८) टायर फुठल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. टँकरचा वेग अचानक कमी झाला. पाठीमागून येणाऱ्या रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत रिक्षा रस्त्याच्या खाली घेतली. मात्र रिक्षाच्या पाठीमागून आलेली दुचाकी (एमएच १७ सीबी २७२२) थेट टँकरवरच जाऊन आदळली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रणदिवे यांना शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

टँकर चालकाने घटनेनंतर पसार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला एक किलोमीटर पाठलाग करून पकडले. टँकर पाथर्डी तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष परदेशी तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर