शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाभरात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:15 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसामाजिक समता सप्ताहाचा समारोप

अहमदनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या सामाजिक समता सप्ताहाचा आज समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे, असे प्रतिपादन केले.शहरातील सीएसआरडी महाविद्यालयात आज सामाजिक समता सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्रा. संजय नगरकर उपस्थित होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळीच्या कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत व स्वाधार योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या विविध लाभार्थींचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील विशेषांकाचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार नितीन उबाळे यांनी मानले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती