शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कडबाकुट्टीच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:41 IST

पदरमोड करून वस्तूची खरेदी, जीएसटीचा भुर्दंड आणि न वटणारे धनादेश, यामुळे पिको, शिलाई मशीन, कडबाकुट्टी आदी वस्तंूचे शासकीय अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी लाभार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली़.

अहमदनगर : पदरमोड करून वस्तूची खरेदी, जीएसटीचा भुर्दंड आणि न वटणारे धनादेश, यामुळे पिको, शिलाई मशीन, कडबाकुट्टी आदी वस्तंूचे शासकीय अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी लाभार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली़. जिल्हा बँकेचे धनादेश न वटल्याने अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर तर अद्यापही अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे लाभार्थींची पंचायत समितीत पायपीट सुरू आहे.शासनाकडून गोरगरिबांना पिको फॉल मशीन, शिलाई मशीन, कडबाकुट्टी यासारख्या वस्तूंचे वाटप केले जात असे. चालूवर्षी मात्र वस्तूंचे वाटप न करता अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून महिलांना पिको फॉल मशीन, शिलाई मशीन, शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, विद्युत मोटार, भजन साहित्य वाटपासाठी लाभार्थींची निवड करण्यात आली.  निवड झालेल्या लाभार्थींना वस्तू खरेदीसाठी पूर्व संमती दिली गेली. लाभार्थींनी वस्तू खरेदी केल्या. वस्तूची खरेदी करताना त्यावरील जीएसटी लाभार्थींनाच भरावा लागला.जीएसटीचा भुर्दंड सोसत लाभार्थींनी वस्तू खरेदी केली. त्यातही बिले ३१ मार्चपूर्वीची असतील तरच अनुदान मिळेल, अन्यथा अनुदान मिळणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बिल मिळविण्यासाठी लाभार्थींना दुकानदारांकडे हात पसरावे लागले. एवढे सर्व करूनही पंचायत समितीने दिलेले जिल्हा बँकेचे धनादेश राष्ट्रीयकृत बँकांनी स्वीकारले नाहीत. त्यामुळे लाभार्थींची चांगलीच धावपळ उडाली. जिल्हा परिषद सदस्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग आली. जिल्हा परिषदेने बँकेकडे पैसे जमा करण्याची मागणी केली. जिल्हा बँकेने अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली. मात्र पैसे खात्यावर जमा होण्यास विलंब झाला. परिणामी दुकानदारांनीही लाभार्थींकडे पैशासाठी तगादा सुरू केला. त्यामुळे लाभार्थींचीही चांगलीच अडचण झाली. यावर कळस असा की, अनेक लाभार्थींना ३१ मार्चपूर्वीची बिले मिळणे कठीण झाले.  त्यामुळे लाभार्थींना पूर्व संमती मिळविण्यापासून अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद