कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथे भारतीय डाक विभागाच्या वतीने सोमवारी (दि. ९) ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी शहीद जवान सुनील वल्ट्टे यांच्या स्मारकास सेवानिवृत्त मेजर विनायक शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र देशमुख होते. याप्रसंगी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष त्र्यंबक सरोदे, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण वल्ट्टे, माजी पोस्ट मास्तर सुरेश जोशी, आबासाहेब वरकड, दत्ता सिनगर, राजेंद्र पगारे, बंडू उघडे, रखमा काकडे, कारभारी खडांगळे, बाळकृष्ण उघडे, डाक आवेक्षक अर्जुन मोरे, संजय ढेपले, किशोर दिघे, संवत्सरचे पोस्ट मास्तर दत्तात्रय गायकवाड, जीवन पवाडे, राहुल आढाव आदी उपस्थित होते.
अडचणीच्या काळात पोस्टाची जीवन विमा योजना फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST